हिंगणघाट येथे टोळी युद्धातून गोळीबार
By Admin | Updated: April 8, 2016 01:55 IST2016-04-08T01:55:36+5:302016-04-08T01:55:36+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य फाटकाजवळ दोन टोळीत गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या....

हिंगणघाट येथे टोळी युद्धातून गोळीबार
पाच गोळ्या झाडल्या
हिंगणघाट : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य फाटकाजवळ दोन टोळीत गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादात गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास एका टोळीने दुसऱ्या टोळीच्या एका सदस्यावर पाच गोळ्या झाडल्या. यात त्याला एकही गोळी लागली नाही; मात्र परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारालगत गत काही महिन्यांपासून दोन टोळीत वाद सुरू आहे. यात आज रात्री सोनू गवळी याच्यावर अवि नरखेडे व त्याच्या अन्य चार साथीदारांनी चारचाकी वाहनात येत १५ फुटाच्या अंतरावरून पाच गोळ्या झाडल्याची तक्रार त्याने पोलीस ठाणे गाठत दिली. शिवाय यावेळी त्याचा सहकारी गुलशन पवनीकर याला लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार निलोत्पल घटनास्थळाकडे रवाना झाले.(तालुका प्रतिनिधी)