पेट्रोल टँकरच्या कॅबिनला आग

By Admin | Updated: June 11, 2014 00:13 IST2014-06-11T00:13:27+5:302014-06-11T00:13:27+5:30

टँकर उभा करून चालक व वाहक चहा घेण्यासाठी गेले असता केबिन मध्ये अचानक बॅटरीजवळ शार्टशर्कीट होऊन केबिनने पेट घेतला. या आगीवर लवकर ताबा मिळविण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला.

A fire in the petrol tanker cabin | पेट्रोल टँकरच्या कॅबिनला आग

पेट्रोल टँकरच्या कॅबिनला आग

समुद्रपूर : टँकर उभा करून चालक व वाहक चहा घेण्यासाठी गेले असता केबिन मध्ये अचानक बॅटरीजवळ शार्टशर्कीट होऊन केबिनने पेट घेतला. या आगीवर लवकर ताबा मिळविण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास जाम चौरस्त्यावर घडली.
चंद्रपूर येथील बबलु ठाकूर यांच्या मालकीचा एमएच ३४-एबी २८५७ क्रमांकाचा टँकर भारत पेट्रोलियम बोरखेडी येथून तीन हजार लिटर पेट्रोल व नऊ हजार लीटर डिझेल घेवून गोंडपिपरीकडे निघाला होता. चालक शेख तौकीक व क्लीनर विलास डडमल हे जाम चौरस्त्यावर वाहतूक पोलीस मदत केंद्राजवळ टँकर उभा करून चहा घेण्याकरिता चहाटपरीवर गेले. त्यांना टँकरच्या केबिनमधून ज्वाळा दिसताच त्यांनी केबिनमधील छोट्या बंबाच्या सहायाने आग विझवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना यश आले नाही. टँकरने पेट घेतल्याने हा महामार्ग बंद करण्यात आला. टँकरमध्ये पेट्रोल होते. जर यावेळी पेट्रोलने पेट घेतला असता तर मोठा अनर्थ झाला असता. वाहतुक पोलिसांनी लागलीच हिंगणघाट नगरपालिकेची अग्निशमक दलाची गाडी पाचारण केली. अग्निशमन येताच १५ ते २० मिनिटात आग आटोक्यात आली. घटनेची माहिती मिळताच येथे पाच ठिकाणच्या अग्निशमन आल्या होत्या. घटनास्थळी आयपीएस राकेश ओला, समुद्रपूरचे ठाणेदार अनिल गिट्टावार, वाहतूक पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक बी.आर.ठाकूर व कर्मचारी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: A fire in the petrol tanker cabin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.