जिल्ह्यात चार ठिकाणी आग
By Admin | Updated: April 17, 2017 00:36 IST2017-04-17T00:36:11+5:302017-04-17T00:36:11+5:30
जिल्ह्यात रविवारी चार ठिकाणी आग लागली. सेलू तालुक्यात दोन घटना घडल्या.

जिल्ह्यात चार ठिकाणी आग
सेलूत सहा तास वीज बंद : दोन घटनेत पाच गोठे खाक
जिल्ह्यात रविवारी चार ठिकाणी आग लागली. सेलू तालुक्यात दोन घटना घडल्या. दोन्ही आगी शेताचे धुरे पेटविल्याने लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सेलू येथील आगीत वीज वितरण कंपनीचे सबस्टेशन आगीच्या भक्ष्यस्थानी येण्यापूर्वी आगीवर ताबा मिळविला तर केळझर येथे सिद्धीविनायक मंदिर परिसरात आग लागल्याने मोठे नुकसान झाले. गिरोली (ंइंगळे) येथे चार तर भिवापूर येथे एक गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी आला.
सेलू : शेतकऱ्याने धुरा पेटविल्याने आगीचे रूप धारण करताच रेहकी मार्गावरील पारेषण कंपनीचे पॉवर स्टेशन आगीच्या विळख्यात आले. येथे यात काम करणाऱ्या दोन रोजंदारी कर्मचाऱ्यांनी वेळीच समयसुचकता दाखवित आगीवर ताबा मिळविला. यामुळे हे दोन्ही सबस्टेशन थोडक्यात बचावले. ही घटना रविवारी दुपारी घडली. या आगीमुळे सहा तास वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.
सेलू परिसराला वीज पुरविणाऱ्या पारेषण कंपनीच्या येथील १३२ व ३३ केव्ही उपकेंद्राजवळील शेतात धुरा जाळला. यावेळी असलेल्या वाऱ्यामुळे आगीने उपकेंद्राला वेढले. आग लागताच सेलू शहराचा व परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. या आगीने उपकेंद्रात कार्यरत कर्मचारी अक्षरशा घाबरुन गेले होते; परंतु त्या उपकेंद्रात कंत्राटी पद्धतीने कामावर असलेले आशुतोष धोटे व जयंत टोंगे या दोन युवकांनी समयसुचकता दाखवून धाडस करीत आगीवर नियंत्रण मिळविले.(तालुका प्रतिनिधी)