वनविभागाच्या नर्सरीला आग
By Admin | Updated: June 13, 2016 00:30 IST2016-06-13T00:30:57+5:302016-06-13T00:30:57+5:30
हिंगणी वनपरिक्षेत्राच्या आकोली बिटातील मसाळा नजीकच्या वनविभागाच्या नर्सरीला आग लागली.

वनविभागाच्या नर्सरीला आग
हिंगणी वनपरिक्षेत्रातील घटना : पाच एकरातील सागवान खाक
आकोली : हिंगणी वनपरिक्षेत्राच्या आकोली बिटातील मसाळा नजीकच्या वनविभागाच्या नर्सरीला आग लागली. या आगीत पाच एकरातील सागवृक्ष जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना रविवारी दुपारी घडली.
या नर्सरीत १० ते १२ एकर जागेवर चार वर्षांपूर्वी वृक्ष लागवड करण्यात आली होती. येथील झाडे चांगली बहरली होती. अचानक दुपारी आगीने भडका घेतला. वाळलेले गवत व काडीकचरा पेटल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. सदर बाब मसाळा गावात मुख्यालयी राहणारे वनरक्षक जी.डी. साबळे व ए.वाय. आगोसे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी क्षेत्र सहायक राजू तुमडाम यांना माहिती दिली. घटनास्थळी दोन ब्लोअर मशीनसह वन कर्मचारी दाखल झाले. वनरक्षक व्ही. एन. खेलकर, जे.एस. काळबांडे, वनमजूर अरूण मरकाम, अशोक वाटकर, मारोती भांडेकर, शरद सिराम व ग्रामस्थ संजय नरताम, रणजित काकरवास, अंकित राऊत, ठाकरे, राजू उईके यांनी ब्लोअर मशीन व पाण्याने आग नियंत्रणात आणली. वनरक्षक मुख्यालयी नसते तर १०-१२ एकरातील वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असते.(वार्ताहर)