दोन ठिकाणच्या आगीत गोठा आणि ऊस जळून खाक
By Admin | Updated: May 21, 2015 02:03 IST2015-05-21T02:03:59+5:302015-05-21T02:03:59+5:30
जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. मंगळवारी ४७.५ अंशावर गेलेला पारा बुधवारी ४७.२ अंशावर स्थिरावला.

दोन ठिकाणच्या आगीत गोठा आणि ऊस जळून खाक
बोरधरण/सेवाग्राम : जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. मंगळवारी ४७.५ अंशावर गेलेला पारा बुधवारी ४७.२ अंशावर स्थिरावला. यातच बुधवारी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील मोही येथे नारायण निकोडे यांचा गोठा तर सेवाग्राम नजीकच्या खरांगणा(मो.) येथील डॉ. शिरीश गोडे यांचा ऊस जळाला. यात दोन्ही शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
बोरधरण नजीकच्या नारायण निकोडे यांच्या शेतामधील गुरांचा गोठा हा शॉर्ट सर्कीटमुळे जळून खाक झाला. त्यांच्या शेतामध्ये काहीच अंतरावर वीजवितरणची डीपी आहे. या डिपीमध्ये शॉर्ट सर्कीट झाला. ताराच्या घर्षणामुळे गोठ्यावर ठिणग्या पडून पाहता पाहता आगीने भीषण रूप धारण करीत गोठा पूर्णत: जळून खाक झाला.
यात गोठ्यामध्ये असलेली १०क्विंटल हळद व पाच रबरी पाईप, वखर, दतारी, ३ डवरे, २ फवारणी पंप ५ स्प्रिंक्लर नोझल, असा एकूण जवळपास एक लाख रूपयांचा माल जळून खाक झाला.
सेलू पोलीस स्टेशनला आगीची महिती देण्यात आली. पुढील तपास बिट जामदार संजय लोहकरे करीत आहे. वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे ही आग लागल्याचा आरोप निकोडे यांनी केला असून याची नुकसान भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली.(वार्ताहर)