हिंगणघाट येथे सायकल स्पेअर पार्टच्या दुकानाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 16:22 IST2021-04-11T16:22:16+5:302021-04-11T16:22:33+5:30
हिंगणघाट - येथील कारंजा चौक स्थित एका सायकलच्या दुकानाला आग लागुन पाच लाखाचे नुकसान झाले.

हिंगणघाट येथे सायकल स्पेअर पार्टच्या दुकानाला आग
हिंगणघाट - येथील कारंजा चौक स्थित एका सायकलच्या दुकानाला आग लागुन पाच लाखाचे नुकसान झाले.
अईन बाजारओळीतील दुकानाला आज दिनांक ११ एप्रीलला दुपारी आग लागल्यानंतर न.प.च्या अग्नीशमन विभागाने तत्पर कारवाई केल्याने सुदैवाने आग पसरली नाही.
हिंगणघाट शहरातील कारंजा चौक येथे मुख्य मार्गावर सुरेश उर्फ बंडु चंपतराव ठाकरे यांचे सायकल विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. आज दि.११ रोजी दुपारी ११ वाजता या लॉकडाउनमुळे बंद असलेल्या दुकानातुन धुर निघतांना दिसला. उपस्थितांनी त्वरीत दुकानाचे मालक सुरेश ठाकरे व न.प.च्या अग्नीशमन विभागाला आग लागल्याची माहीती दिली. अग्नीशमन विभागाने तातडीने आग विझवुन पुढील अनर्थ टाळला.
या आगीत दुकानातील नविन व जुन्या सायकली, टायर, ट्युब, सायकलच्या फ्रेम,रींग, हवेचे काँप्रेसर व ईतर सुटे भाग व साहित्य जळुन खाक झाल्याने जवळजवळ पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग कशामुळे लागली याची माहीती मिळु शकलेली नसुन हिंगणघाट पोलिस पुढील तपास करीत आहे.