शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनायनात नियमोल्लंघन करणाऱ्यांकडून २९.६७ लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 22:12 IST

जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयासह सेवाग्राम येथील कोविड केअर सेंटर आणि सावंगी येथील कोविड केअर सेंटरमध्ये पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या समाधानासाठी या चौक्यांमध्ये दिवसरात्र पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. डॉक्टरांवर होणारे हल्ले, रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या रोषाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस दलाने हे पाऊल उचलले आहे.

ठळक मुद्देपोलीस दलाची पाच महिन्यांतील कारवाई : १७ तपासणी नाक्यांवर पोलीस तैनात

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील दीड वर्षांपासून पोलीस दल कोरोनाशी लढा देत आहेत. अनेक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाने कवेत घेतले. पण, तरीही पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडण्याचे काम करीत आहे. पोलिसांनी जानेवारी ते मे या पाच महिन्याच्या कालावधीत  नियमोल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करीत तब्बल २९ लाख ६७ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. काेरोनाची दुसरी लाट महाभयंकर असून रुग्णसंख्येसोबतच मृत्यूदरातही कमालीची वाढ होत चालली आहे. असे असताना पोलीस प्रशासन देखील परिस्थितशी लढा देण्यास सज्ज झालेले दिसून येत आहे. जिल्ह्यातील १७ तपासणी नाक्यांवरून पोलीस कर्मचारी अहोरात्र कर्तव्य पार पाडत आहेत. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना करुन कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले असून त्यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडत असल्याचे चित्र आहे. इतकेच नव्हे तर लग्नासाठी परवानगी देण्याचे काम असो की, ई-पास देण्याची जबाबदारी हे दोन्ही कार्य  विदर्भात सर्वात आधी वर्धा पोलीस दलानेच सुरू केल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी दिली. दीड हजार पोलीस कर्मचारी आणि २०० अधिकाऱ्यांच्या खांद्यावर नागरिकांची सुरक्षा करण्याचे काम पोलीस विभागाकडून सुरु असून हे काम अविरत सुुरू ठेवणार असे ते म्हणाले.

शासकीय रुग्णालयांत उभारल्या चौक्या जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयासह सेवाग्राम येथील कोविड केअर सेंटर आणि सावंगी येथील कोविड केअर सेंटरमध्ये पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या समाधानासाठी या चौक्यांमध्ये दिवसरात्र पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. डॉक्टरांवर होणारे हल्ले, रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या रोषाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस दलाने हे पाऊल उचलले आहे.

९४० वाहनांवर कारवाई कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले असले तरी मोकाट फिरणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही, अशांवर कारवाई करीत पोलिसांनी त्यांच्याकडून दंड वसूल केला. तब्बल ९४० वाहनांवर कारवाई करण्यात आली असून काही दुचाक्या देखील जप्त करण्यात आल्या. 

कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षाही भयंकर आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. विनाकारण घराबाहेर न फिरणे, सामाजिक अंतर राखणे आदी कोरोना नियमांचे पालन करावे. विनाकारण बाहेर फिरल्यास नाईलाजास्तव नागरिकांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. -प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक. 

पोलीस रुग्णालय ठरले राज्यात पहिले- जिल्हा प्रशासनाने केंद्र वाढविण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी तात्काळ पोलीस रुग्णालयात लसीकरण केंद्र देण्यास मंजुरी दिली. राज्यात पोलीस रुग्णालयात लसीकरण केंद्र दिल्याचा पहिला प्रयोग होता. त्यानंतर इतरही जिल्ह्यातील पोलीस रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस