अखेर सरपंच व उपसरपंच पायउतार

By Admin | Updated: April 17, 2016 02:12 IST2016-04-17T02:12:44+5:302016-04-17T02:12:44+5:30

जिल्ह्यात सर्वात मोठ्या असलेल्या नाचणगाव ग्रामपंचायतीतील अविश्वास वादळ आज शमले. नायब तहसीलदार स्रेहल ढोक ...

Finally, the sarpanch and the sub-punch step up | अखेर सरपंच व उपसरपंच पायउतार

अखेर सरपंच व उपसरपंच पायउतार

ठरावाच्या बाजूने १६ सदस्यांचे मतदान
नाचणगाव : जिल्ह्यात सर्वात मोठ्या असलेल्या नाचणगाव ग्रामपंचायतीतील अविश्वास वादळ आज शमले. नायब तहसीलदार स्रेहल ढोक यांच्या उपस्थितीत सरपंच सुनिता जुनघरे व उपसरपंच तुषार पेंढारकर यांच्या १४ सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. सरपंच अनुपस्थित होते, तर उर्वरित १६ सदस्य उपस्थित होते.
१७ सदस्यीय कमिटीत सतराही सदस्य निवडून येण्याचा कार्यकाळ जेमतेम दोन वर्षांचा पूर्ण होत आहे. ज्या मुद्यावर अविश्वास ठराव सदस्यांनी दाखल केला त्या मुद्यावर चर्चा करण्याचे नायब तहसीलदार स्रेहल ढोक यांनी सदस्यांना सांगितले. परंतु आपण पहिलेच सहीनिशी निवेदन सादर केल्याचे तहसीलदारांना सदस्यांनी सांगितले व चर्चा करण्यास असहमती दर्शविली.
सरपंच सुनिता जुनघरे यांच्या अविश्वास ठरावावर घेण्यात आलेल्या मतदानात उपस्थितीत १६ ही सदस्यांनी विरोधात मतदान केल्याने तहसीलदार ढोक यांनी १६ विरूद्ध शून्य मतांनी ठराव पास झाल्याचे सांगितले. मतदान हे हात उंचावून घेण्यात आले. उपसरपंचावरील अविश्वास ठराव सदस्यांनी दाखल केलेल्या मुद्यांवर चर्चा घेण्यात आली. यआवर सदस्य तसेच उपसरपंच तुषार पेंढारकर यांनी आपली बाजू मांडली. १४ विरूद्ध २ मतांनी उपसरपंचावर अविश्वास ठराव बहुमताने पारीत झाल्याचे नायब तसीलदार ढोक यांनी सांगितले. आपल्यावरील लावण्यात आलेल्या मुद्यांचे उपसरपंचाने खंडन केले.(वार्ताहर)

Web Title: Finally, the sarpanch and the sub-punch step up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.