अखेर देवळीच्या रुग्णालयाला मिळाले वैद्यकीय अधीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 05:00 AM2020-09-29T05:00:00+5:302020-09-29T05:00:02+5:30

ग्रामीण रुग्णालयाच्या निर्मितीनंतर मागील पाच ते सहा वर्षांपासून येथील ग्रामीण रुग्णालयाचा डोलारा वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय अधिकाऱ्याविनाच सुरु होता. रुग्णालयाचा कारभार एक ते दोन शिकावू वैद्यकीय अधिकारी व काही मोजक्या कर्मचाऱ्यांच्या भरोशावर सुरु होता.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांच्या दुर्लक्षीतपणामुळे अनियमिततेला मोठ्या प्रमाणात वाव मिळत होता.

Finally, Deoli Hospital got a medical superintendent | अखेर देवळीच्या रुग्णालयाला मिळाले वैद्यकीय अधीक्षक

अखेर देवळीच्या रुग्णालयाला मिळाले वैद्यकीय अधीक्षक

Next
ठळक मुद्देनागरिकांची प्रतीक्षा संपली : कोलमडलेली आरोग्य व्यवस्था होणार सुरळीत

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : दीर्घ कालावधीच्या प्रतिक्षेनंतर देवळी येथील ग्रामीण रुग्णालयाला वैद्यकीय अधीक्षक मिळाले आहे. या पदासाठी दोन दिवसांपूर्वी डॉ. आशिष लांडे यांनी पूर्णवेळ अधीक्षक म्हणून पदभार सांभाळला आहे. त्यामुळे देवळीकरांची प्रतीक्षा संपली असून आरोग्य व्यवस्थेला चालना मिळणार असल्याची अपेक्षा आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या निर्मितीनंतर मागील पाच ते सहा वर्षांपासून येथील ग्रामीण रुग्णालयाचा डोलारा वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय अधिकाऱ्याविनाच सुरु होता. रुग्णालयाचा कारभार एक ते दोन शिकावू वैद्यकीय अधिकारी व काही मोजक्या कर्मचाऱ्यांच्या भरोशावर सुरु होता.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांच्या दुर्लक्षीतपणामुळे अनियमिततेला मोठ्या प्रमाणात वाव मिळत होता. त्यामुळे याठिकाणी पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक नेमण्यासाठी अनेक वर्षाची मागणी होती. नव्याने रुजू झालेले डॉ. लांडे यांच्यासमोर रुग्णालयासंबंधित अनेक आव्हाने उभी आहेत. रुग्णालयात अजूनही अनुभवी वैद्यकीय अधिकारी व निकषाप्रमाणे परिचारीका व कर्मचाºयांची कमतरता आहे. रुग्णालयातील क्ष-किरण मशीन जुनाट व नादुरुस्त असून दुसºया रुग्णालयाच्या वापरातील आयात करण्यात आली आहे. शवविच्छेदनाची वास्तू वापर होण्यापूर्वीच मोडक्या स्थितीत आली आहे. या वास्तूलगतच झाडाझुडपांनी वेढले असल्याने ही वास्तू हरविलेल्या स्थितीत आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णांना आजू-बाजुच्या घरांचा आसरा घ्यावा लागतो आहे.

रुग्णालयाला जडला ‘रेफर’चा आजार
रुग्णालयाची वास्तू सुसज्ज असली तरी याठिकाणी परिसरातील दाखल होणाºया रुग्णांना व्यवस्थेअभावी जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा सावंगी येथील रुग्णालयाचा रस्ता दाखविला जात आहे. रुग्णालयात रुग्णवाहिकेची व्यवस्था नसल्याने कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेच्या रुग्णांसोबतच अतीमहत्त्वाच्या असलेल्या रुग्णांची फरपट होत आहे.

रुग्णालय परिसरात कचऱ्याचे साम्राज्य
रुग्णालय परिसरात स्वच्छतेचा अभाव असून सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची अडचण होत आहे. रात्रीच्या सुमारास रुग्णालय ओस पडल्याचे दिसते. रुग्णांना रुग्णालयात येताना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.

नवीन वैद्यकीय अधीक्षकांपुढे आव्हान
रुग्णालय परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, झाडझुडपांचा वेढा आहे. तसेच रुग्णवाहिकेची सुविधा नाही, आदी विविध समस्यांचा डोंगर उभा असल्याने नव्यानेच रुजू झालेल्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. आशिष लांडे यांच्यापुढे मोठे आव्हान उभे आहे.

Web Title: Finally, Deoli Hospital got a medical superintendent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर