अखेर अध्यक्ष सचिवांची निवड

By Admin | Updated: February 15, 2015 01:42 IST2015-02-15T01:42:54+5:302015-02-15T01:42:54+5:30

पाणी पुरवठा स्वच्छता सिमतीच्या अध्यक्षाच्या निवडीवरून दोन वेळा ग्रामसभा तहकूब झाली होती. या समितीच्या अध्यक्ष व सचिपदाची निवड झाल्याने अखेर हा वाद निवळला.

Finally, the choice of the President's Secretariat | अखेर अध्यक्ष सचिवांची निवड

अखेर अध्यक्ष सचिवांची निवड

नाचणगाव : पाणी पुरवठा स्वच्छता सिमतीच्या अध्यक्षाच्या निवडीवरून दोन वेळा ग्रामसभा तहकूब झाली होती. या समितीच्या अध्यक्ष व सचिपदाची निवड झाल्याने अखेर हा वाद निवळला. समितीच्या अध्यक्षपदी पुष्पा खडसे तर सचिवपदी दीपक आंबेकर यांची निवड झाली.
मागील आठवड्यात तहकुब झालेली ग्रामसभा शुक्रवारी भीमोदय वाचनालयाच्या समोरील आवारात झाली. सभेच्या अध्यक्षपदाकरिता वैशाली घोडेस्वार व उषा पाटील यांची नावे आली. यावेळी वैशाली घोडेस्वार यांची एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्षाने ग्रामसभेला सुरुवात केली. यावेळी दोन विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, पोलीस ताका, व्हिडीओ चित्रिकरण अशा मोठ्या नियोजनात सभेला सुरुवात झाली. अध्यक्ष निवडीचा वाद सुटता सुटेना. अशात ग्रामविकास अधिकाऱ्याने केलेल्या आक्षेपाह विधानाने आणखीच गोंधळ उडाला. ग्रामविकास अधिकारी बोबडे यांनी उपस्थित ग्रामस्थांची माफी मागितल्याने वाद निवळला. अध्यक्षाची निवड ईश्वरचिट्ठीने करावी की मतदानाने यावर तोडगा निघत नव्हता. अखेर निवडणुकीद्वारे हात उंचावून मतदान घेवून अध्यक्षस्थाची निवड करण्यात आली. पुष्पा खडसे व प्रवेश चिनेवार यांच्यात झालेल्या निवडणुकीत पुष्पा खडसे विजयी झाल्या. सचिवच्या निवडणुकीत प्रविण घोडेस्वार यांचा पराभव करत दीपक आंबेडकर विजयी झाले. (वार्ताहर)
उन्हात ताटकळत नागरिक उभे
ग्रामसभा ही खुल्या आवारात घेतल्याने नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागला. सभा बराच वेळ सुरू असल्याने नागरिकांत ताटकळत रहावे लागले. काहिंनी लगतच्या वडाच्या झाडाचा तसेच तेथील ओट्याचा बसण्यासाठी आसरा घेतला. दोन सभा सभागृहात तर एक मोकळ्या आवारात यामुळे नागरिकांत नाराजीचा सुरू होता.
अध्यक्षांनी निर्णय राखून ठेवला
पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या अध्यक्ष पदाच्या निवडीनंतर निवडणुकीचा निर्णय ग्रामसभा अध्यक्ष वैशाली घोडेस्वार यांनी राखुन ठेवला. ग्रामपंचायत प्रशासनातर्फे निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शकपणे राबविण्यात आल्याची हमी ग्रामपंचायत नाचणगावचे ग्रामविकास अधिकारी बोबडे यांनी दिली. तसेच प्रक्रिया ही पंचायत समितीच्या दोन विस्तार अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली होती असे सांगण्यात आले. तेव्हा दोन्ही पक्षांचा कल लक्षात घेता अखेर ग्रामसभा अध्यक्षांनी पुष्पा खडसे विजयी झाल्याची घोषणा केली.

Web Title: Finally, the choice of the President's Secretariat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.