अखेर सेंट अॅन्थोनीची शुल्कवाढ मागे
By Admin | Updated: March 21, 2015 02:05 IST2015-03-21T02:05:54+5:302015-03-21T02:05:54+5:30
येथील सेंट अॅन्थोनी कॉन्व्हेंटमध्ये शुल्क वाढ झाल्याने पालकांकडून त्याचा निषेध नोंदविण्यात आला.

अखेर सेंट अॅन्थोनीची शुल्कवाढ मागे
वर्धा : येथील सेंट अॅन्थोनी कॉन्व्हेंटमध्ये शुल्क वाढ झाल्याने पालकांकडून त्याचा निषेध नोंदविण्यात आला. ही वाढ कायद्याच्या विरोधात असल्याचा आरोप करून पालकांनी आंदोलन पुकारले होते. तशी तक्रारही प्राथमिक शिक्षण विभागाकडे करण्यात आली होती. शिक्षण विभागाच्यावतीने चौकशी सुरू असताना शुक्रवारी या संदर्भात शाळा व्यवस्थापण समितीत झालेल्या बैठकीत वाढीव शुल्क वापस घेण्याचा निर्णय झाला.
सेंट अॅन्थोनी या शाळेने यंदाच्या शैक्षणिक सत्रात मोठ्या प्रमाणात शुल्कवाढ केली होती. ही शुल्कवाढ सर्वसामान्य पालकांना न परवडणारी होती. यामुळे पालकांनी एकत्र येत शाळेच्या या मनमानी धोरणाविरोधात आंदोलन पुकारले. शाळेच्यावतीने करण्यात आलेली शुल्क वाढ अवाजवी असून ती कायद्याच्या विरोधात असल्याचा आरोप करीत पालकांनी या विरोधात शिक्षण विभागाकडे तक्रार नोंदविली होती. या तक्रारीवरून शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांनी पाच सदस्यीय समिती गठित करून जिल्ह्यातील सर्वच शाळांची तपासणी करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रविंद्र काटोलकर यांना केली. या समितीचे गठण होवून चौकशी सुरू असतानाच शाळेच्या व्यवस्थापन समितीने पालकांची बैठक घेतली. या बैठकीत पालक व व्यवस्थापनात चांगलीच खडाजंगी झाली. विजय नगराळे यांच्या पुढाकारात पालकांनी घेतलेल्या भूमिकेसमोर शाळा व्यवस्थापन नमले. यात वाढलेले शुल्क वापस करीत जुन्याच शुल्कात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे जाहीर केले. यामुळे पालकांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी झालेल्या चर्चेला सतीश वैद्य, किशोर वानखेडे, हेमंत गहलोत, प्रशांत काकडे, विकास गोमासे, पंकज गिरीपूंजे, भास्कर भांगे, सचिन ढगे, अतुल जाटवे यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)