चित्रपटातून सामाजिक जीवनाचा चेहरा हरविला
By Admin | Updated: September 29, 2014 23:09 IST2014-09-29T23:09:49+5:302014-09-29T23:09:49+5:30
भारतीय सिनेमाच्या कालखंडात सन १९७० पासून सामाजिक सिनेमाचा बोलबाला होता. चित्रपट हे शक्तिशाली माध्यम आहे. यातून सामाजिक बदल घडवून आणता येतात; मात्र आजच्या घडीला या माध्यमाचा काही

चित्रपटातून सामाजिक जीवनाचा चेहरा हरविला
वर्धा : भारतीय सिनेमाच्या कालखंडात सन १९७० पासून सामाजिक सिनेमाचा बोलबाला होता. चित्रपट हे शक्तिशाली माध्यम आहे. यातून सामाजिक बदल घडवून आणता येतात; मात्र आजच्या घडीला या माध्यमाचा काही लोक दुरुपयोग करत आहेत. आजच्या काळात मनोरंजनप्रधान चित्रपट जास्त प्रमाणात तयार होत आहे. भारतीय चित्रपटातील सामाजिक जीवनाचा चेहरा आता हरवत आहे, असे मत ज्येष्ठ सिनेअभिनेते ओम पुरी यांनी व्यक्त केले.
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील नाट्यकला व फिल्म अध्ययन विभागाच्या वतीने २९, ३० सप्टेंबर ते १ आॅक्टोबर रोजी तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारोहाच्या उद्घाटन सोमवारी झाले. यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. गिरीश्वर मिश्र होते. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या फिल्म प्रभागचे महानिदेशक व्ही. एस. कुंडू, एफ. टी. आय. आय. पुण्याचे सिनेमेटोग्राफीचे भरत नेरकर आणि विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. चित्तरंजन मिश्र व्यासपीठावर उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सिनेअभिनेता ओम पुरी यांना कुलगुरू प्रा. गिरीश्वर मिश्र यांच्या हस्ते सत्यजित राय सन्मान देऊन गौरविण्यात आले.
या समारोहात फेब्रुवारी २०१४ मध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविण्यात आलेल्या उत्कृष्ट चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. महोत्सवात जवळपास २२ चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.
कुलगुरू प्रा. गिरीश्वर मिश्र म्हणाले, ओम पुरी प्रत्येक प्रकारची पात्रे उभी करतात. ते अभिनयात तल्लीत हऊन पात्रांना न्याय देतात. उद्घाटन कार्यक्रमात फिल्म प्रभागचे महानिदेशक व्ही. कुंडू तथा एफ.डी.आय. पुणेचे सिनेमेटोग्राफीचे भरत नेरकर, प्रफुलगुरू प्रा. चित्तरंजन मिश्र यांनीही संबोधित केले. संचालन नाट्यकला व फिल्म अध्ययन विभागाचे अधिष्ठाता प्रा. सुरेश शर्मा यांनी केले.(प्रतिनिधी)