युवा नेक्स्टचा उपक्रम : चित्रकार विजय राऊत यांनी दिले प्रशिक्षणवर्धा : लोकमत युवा नेक्स्ट व कॉलेज आॅफ अॅनिमेशन अॅन्ड रिसर्च सेन्टर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने फिल्मी फ्युजन, फिल्म मेकिंगवर आधारित अद्भुत असा फिल्मी फ्युजन शो वर्धा शहरार पार पडला. स्थानिक दादाजी धुनिवाले सभागृह येथे या फिल्मी शो ला युवावर्गच नाही तर आबालवृद्धांनी उपस्थिती दर्शवित उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.सेमिनार म्हटले की अनेकांना ते कंटाळवाणे वाटते. परंतु हा सेमिनार याला अपवाद ठरला. अॅनिमेशन फिल्म मेकींगवर आधारित हा सेमिनार मनोरंजक आणि माहितीपूर्ण असल्याने प्रेक्षकांची दाद मिळवून गेला. अॅनिमेशन कॉलेज अमरावती चे संचालक विजय राऊत, प्रसिद्ध मिमिक्री आर्टिस्ट सुधीर वानखडे व महाविद्यालयाच्या ४० विद्यार्थ्यांनी आपल्या नाविण्यपूर्ण कलाकृतीने सर्वांना खिळवून ठेवले. फिल्म मेकिंगसाठी आवश्यक माहिती त्यांनी प्रात्यक्षिकासह दिली. विजय राऊत यांनी अॅनिमेशन आणि व्ही.एन.एक्स आणि फ्युचर आर्ट संदर्भात माहिती दिली. या क्षेत्रात आर्ट, इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञानाचा जागतिकस्तरावर कशाप्रकारे वापर होतो हे डिजीटल प्रेझेन्टेशनसह दाखविले. उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी मेडिकल, इंजिनिअरींग, आर्ट, कॉमर्स, सायन्स अशा पारंपारिक अभ्यासक्रमासोबत याची जोड देण्याचे सांगितले. जगात नेमके काय सुरू आहे, फ्युचरकरिता विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे याचा त्यांनी उलगडा केला. तसेच शीघ्र ड्रार्इंग आणि पेन्टींगची प्रचिती देत प्रेक्षकांना अनोखा अनुभव दिला. सुधीर वानखडे यांनी फिल्मचा आवाज कसा दिला जातो याचे डबिंग करुन दाखविले. ‘बळी बळी राजाचा’ हे मायमिंग नाट्य सादर केले. नृत्य, हॉलीवूड फिल्मसाठी कॅरेक्टर कसे तयार केल्या जातात, कुठल्या स्तरावर ते अॅक्टींग करतात याचा अप्रतिम प्रयोग सादर केला. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना विविध मार्ग उपलब्ध असताना फिल्म अॅनिमेशन हे एक नव दालन असल्याचा या सेमिनारचा सुर होता.कार्यक्रमाला सुनील बुरांडे, संजय इंगळे तिगावकर, ज्योती भगत, संगिता इंगळे, प्रदीप वर्मा, अजय पळसापुरे, श्रीकांत बिजवार यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांसाठी एक नवीन संधी उपलब्ध करुन देणारा कार्यक्रम होता. नोकरीच्या संधीबाबत राऊत यांनी माहिती दिली. यावेळी युवा नेक्स्ट संयोजक रंजित कांबळे, सतीश कांबळे, तुषार पाटील, राजेश चोपडे आदींनी सहकार्य केले.(उपक्रम प्रतिनिधी)
अद्भुत कलाकृतींनी साकारला फिल्मी ‘फ्युजन शो’
By admin | Updated: July 28, 2014 23:41 IST