शिक्षकांच्या वेतनाचा मार्ग मोकळा

By Admin | Updated: January 10, 2015 22:59 IST2015-01-10T22:59:58+5:302015-01-10T22:59:58+5:30

जिल्ह्यातील अनेक माध्यमिक शाळांनी अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना रूजू करून घेतले नाही़ अशा शाळांतील सर्वच शिक्षक कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर व डिसेंबरचे वेतन

Fill the path of teachers' salary | शिक्षकांच्या वेतनाचा मार्ग मोकळा

शिक्षकांच्या वेतनाचा मार्ग मोकळा

प्रकरण : समायोजनास नकार देणाऱ्या शाळेतील शिक्षकांचे वेतन रोखले होते
वर्धा : जिल्ह्यातील अनेक माध्यमिक शाळांनी अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना रूजू करून घेतले नाही़ अशा शाळांतील सर्वच शिक्षक कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर व डिसेंबरचे वेतन शिक्षणाधिकारी कार्यालयाच्यावतीने थांबविले होते़ याची माहिती शिक्षण उपसंचालक नागपूर यांना मिळताच त्यांनी शिक्षकांचे वेतन देण्याचे आदेश दिले आहेत.
अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यास नकार देणाऱ्या शाळांवर कठोर कार्यवाही करून प्रसंगी अशा शाळांतील ती पदे कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई करण्याचे १४ आॅक्टोबरच्या शासन निर्णयात नमूद असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. यामुळे शिक्षकांचे वेतन देण्याच्या सूचना सहविचार सभेत शिक्षणाधिकारी संजय डोरलीकर व वेतन पथक अधीक्षक वर्षा बेले यांना देण्यात आले आहेत. सोबतच शिक्षकांचे डिसेंबर महिन्याचे प्रलंबित वेतन अदा करणे, जानेवारी देयके स्वीकारण्याचे मान्य करण्यात आले.(प्रतिनिधी)

Web Title: Fill the path of teachers' salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.