शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

स्टेट बँकेच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 05:00 IST

सध्या तालुक्यातील शेतकरी चातकासारखे पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. इतकेच नव्हे तर पीककर्ज मिळावे म्हणून त्यांच्याकडून प्रयत्न केले जात आहे. परंतु, बँकेच्या अधिकाऱ्यांच्या हेकेखोर धोरणामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांनी एकत्र येत कोरा येथे मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले.

ठळक मुद्देपीककर्जासाठी टाळाटाळ भोवली : जिल्हाधिकाऱ्यांकडून कानउघाडणी

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यातील निंभा येथील स्टेट बँक तसेच कोरो व नंदोरी येथील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेतून शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने कोरो येथे सुमारे २०० शेतकऱ्यांनी बँकांच्या गलथान कारभाराच्या विरोधात मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. याची दखल आमदारांसह जिल्हाधिकाऱ्यांनी घेत बँकेच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलीच कानउघाडणी केली. शिवाय निंभा येथील स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सध्या तालुक्यातील शेतकरी चातकासारखे पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. इतकेच नव्हे तर पीककर्ज मिळावे म्हणून त्यांच्याकडून प्रयत्न केले जात आहे. परंतु, बँकेच्या अधिकाऱ्यांच्या हेकेखोर धोरणामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांनी एकत्र येत कोरा येथे मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. ही बाब आ. समीर कुणावार यांच्या लक्षात येताच त्यांनी दखल घेत याची माहिती जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांना दिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसह जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. ओम्बासे, उपविभागीय महसूल अधिकारी चंद्रभान खंडाईत या प्रमुख अधिकाऱ्यांनी नंदोरी, निंभा व कोरा येथील बँक गाठून बँकेच्या अधिकाऱ्यांना पीककर्ज वितरीत करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या याच दौऱ्यादरम्यान निंभा येथील स्टेट बँकेचे व्यवस्थापक दोन महिन्यांत नागपूर येथून केवळ एकच वेळा बँकेत आल्याचे पुढे आले. बँकेचे व्यवस्थापकच बँकेत येत नसल्याने पीककर्जाचे प्रकरणे प्रलंबीत असल्याचे व त्याचा शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचेही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना तहसीलदार राजू रणवीर यांना अधिकाऱ्यांनी दिल्या. वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करून भारतीय स्टेट बँक निभा शाखेचे व्यवस्थापक गजभिये यांच्याविरुद्ध कलम १८८, २६९, २७० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :SBIएसबीआयCrop Loanपीक कर्ज