पंधरा वर्षानंतर हटले अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 06:00 IST2019-11-21T06:00:00+5:302019-11-21T06:00:14+5:30
शिवाजी चौक ते गांधी चौक हा आर्वी शहरातील सर्वात वर्दळीचा मार्ग आहे. सकाळपासून तर रात्रीपर्यंत सतत या मार्गावर वाहनांची गर्दी पहावयास मिळते. मात्र हॉकर्सनी या मार्गावर अतिक्रमण केल्याने मार्ग अरुंद झाला होता. परिणामी या मार्गाने पायदळ चालनेही कठीण झाले होते. या मार्गावरुन जातांना चारचाकी किंचा दुचाकी वाहनांचा कुणालाही धक्का लागला तर वाद व्हायचे.

पंधरा वर्षानंतर हटले अतिक्रमण
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : शहरातील शिवाजी चौक ते गांधी चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले होते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. अखेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी विद्याधर अंधारे यांनी पुढाकार घेत पंधरा वर्षापासूनचे अतिक्रम हटवून रस्ता मोकळा केल्याने शहरवासीयांनी सुटकेचा श्वास घेतला.
शिवाजी चौक ते गांधी चौक हा आर्वी शहरातील सर्वात वर्दळीचा मार्ग आहे. सकाळपासून तर रात्रीपर्यंत सतत या मार्गावर वाहनांची गर्दी पहावयास मिळते. मात्र हॉकर्सनी या मार्गावर अतिक्रमण केल्याने मार्ग अरुंद झाला होता. परिणामी या मार्गाने पायदळ चालनेही कठीण झाले होते. या मार्गावरुन जातांना चारचाकी किंचा दुचाकी वाहनांचा कुणालाही धक्का लागला तर वाद व्हायचे. अशा घटना या मार्गावर नित्याच्याच झाल्या होत्या. त्यामुळे या मार्गावरील अतिक्रमाणामुळे नागरिकांचे अवागमण अडचणीचे झाले होते. शहरवासीयांच्या मागणीनुसार नगरपालिकेचे मुख्याधिकारी विद्याधर अंधारे यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन अतिक्रमण हटविण्याची मोहिम हाती घेतली. त्यांनी या मार्गावरील अतिक्रमण हटवून हातठेले चालकांना नगरपालिकेच्या आठवडी बाजारामध्ये जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच नगरपालिकेतर्फे या रस्त्यावरील दुकानांसमोर दुचाकी वाहनांकरिता पिवळ्या रंगाचा वाहतूक नियंत्रण व्यवस्थापन पट्टाही आखण्यात आला आहे. पुन्हा या मार्गावर हॉकर्सनी आपली दुकानदारी थाटल्यास त्यांच्याविरुद्ध नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्यावतीने कारवाई करण्यात येणार असल्याचेही मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. या करिता उपविभागीय अधिकारी कार्यालय व पोलीस विभागाने सहकार्य करण्याचीही विनंती नगरपालिकेच्या मुख्याधिकाºयांनी केली आहे.