शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

औद्योगिक वसाहतीतील संवेदनशील भागात भीषण आग; ४ तासांनंतर आगीवर नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 13:29 IST

हवेचा जोर असल्याने ही आग काही वेळातच सगळीकडे पोहचली.

देवळी(प्रतिनिधी)- स्थानिक औद्योगिक वसाहत परिसरातील कारखान्यांना पाणीपूरवठा करणाऱ्या वॉटर प्लांटच्या सभोवताल तसेच या परिसरातील २५ एकराच्या आरक्षित जागेतील गवताला भीषण आग लागून वणवा पेटला. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास औद्योगिक वसाहतीतील संवेदनशील भागात ही आग लागल्याने एकच हाहाकार माजला. पॉवरग्रीडच्या भागाकडून ही आग लागुन पाहता पाहता संजय इंडस्ट्रीज जिनिंगपर्यंत पोहचली. 

हवेचा जोर असल्याने ही आग काही वेळातच सगळीकडे पोहचली. काही मजुरांच्या माहितीवरून शिवसेनेचे अनंत देशमुख, माजी नप उपाध्यक्ष प्रा नरेंद्र मदनकर व नायब तहसीलदार राजेंद्र देशमुख यांनी सूत्रे हलविली. देवळी व वर्धा नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. पॉवर ग्रीड, जिनिंग फॅक्टरी व ऑक्सिजन प्लांट च्या संवेदनशील भागात ही आग लागल्याने तहसीलदार राजेश सरवदे यांनी घटनास्थळ गाठुन निर्देश दिले. 

वॉटर प्लांटच्या २५ एकराचे परिसरात जंगल वाढले आहे. औद्योगिक वसाहत प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे हा भाग बाभूळ, बोर तसेच इतर वनस्पती व गवताने व्यापला आहे.अग्निशामक दलाच्या दोन्ही गाड्यांनी अथक परिश्रम करून ही आग आवाक्यात आणली. ही घटना रात्रीची असती तर नक्कीच अनर्थ घडला असता अशी भावना लोकांनी व्यक्त करून एमआयडीसी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.  तसेच भागात आवश्यक सुविधां पुरविण्यात याव्या अशी मागणी केली.

औद्योगिक वसाहत परिसरात वाढलेले गवत तसेच झाडे तोडण्याचे व इतर मेंटनन्सचे काम आमचे नाही. वसाहतीचा पाणीपुरवठा पॉवर ग्रीडमधील सम मधून केला जात आहे. त्यामुळे आगीच्या घटनास्थळी असलेली वॉटर टॅंक निकामी पडली आहे.- मोहन व्यास, डेप्युटी इंजिनिअर,औद्योगिक वसाहत, वर्धा

टॅग्स :fireआग