भरधाव ट्रॅक्टर घरात शिरला, भिंत पडली
By Admin | Updated: March 5, 2017 00:35 IST2017-03-05T00:35:08+5:302017-03-05T00:35:08+5:30
मद्यधुंद असलेल्या एका ट्रॅक्टर चालकाने वेगात ट्रॅक्टर चालविला तो थेट एका घरात शिरला.

भरधाव ट्रॅक्टर घरात शिरला, भिंत पडली
मद्यधुंद चालकाचा प्रताप : भिंत नसती तर विहिरीत कोसळला असता ट्रॅक्टर
आकोली : मद्यधुंद असलेल्या एका ट्रॅक्टर चालकाने वेगात ट्रॅक्टर चालविला तो थेट एका घरात शिरला. ट्रॅक्टर ज्या भिंतीपाशी अडला त्या पासून अवघ्या दोन फुटावर विहीर आहे. भिंत आडवी आल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळला नाही. तसेच परिसरात खेळणारी मुलेसुद्धा बचावली. सदरची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
सदर रस्ता हा अत्यंत वर्दळीचा असून विनोद चिंधुजी कोठाळे यांचे घर रस्त्याच्या कडेला आहे. ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३२ ए. १४३७ हा ब्लॅस्टिंगच्या कामाकरिता वापरला जातो. तो विहिरीचे ब्लॅस्टिंग करून परत येत असताना अचानक एका घरात शिरला. अपघात स्थळापासून अवघ्या दोन फुटावर विहीर आहे. पण धडक बसल्यानंतर ट्रॅक्टर जागीच थांबला अन्यथा अनर्थ घडला असता. पुढे शाळा असून येथे मुलेही खेळत होती. धडक मारुन ट्रॅक्टर चालक पसार झाला.(वार्ताहर)