महिला टेलरींग कामगारांच्या नशीबी वेठबिगारी
By Admin | Updated: June 9, 2014 00:05 IST2014-06-09T00:05:13+5:302014-06-09T00:05:13+5:30
जिल्ह्यात व राज्यभरात हजारोंच्या संख्येने महिला टेलरींग कारागीराचे काम करतात. एखाद्या संस्थेत काम करणार्या या कारागिररांना अत्यल्प मोबदला मिळतो. तरर स्वतंत्रय काम करणार्या काराबिरांना रेडीमेडच्या

महिला टेलरींग कामगारांच्या नशीबी वेठबिगारी
वर्धा : जिल्ह्यात व राज्यभरात हजारोंच्या संख्येने महिला टेलरींग कारागीराचे काम करतात. एखाद्या संस्थेत काम करणार्या या कारागिररांना अत्यल्प मोबदला मिळतो. तरर स्वतंत्रय काम करणार्या काराबिरांना रेडीमेडच्या व्यवसायामुळे पाहिजे तसे काम मिळत नाही. यामुळे एकत्र आलेल्या महिला टेलरिंग कारागिरांनी सेवाग्राम ग्रामपंचायतीत बैठक घेत या महिलांना योग्य मोबदला मिळावा अशी मागणी केली.
ठेकेपद्धतीने काम करणार्या कारागिरांना दिवसातून १0 ते १४ तास काम करावे लागते. अशा सर्व महिला कारागिरांना राज्य शासनाच्यावतीने असंघटीत कामगारांचा दर्जा देऊन त्यांना घरकामगार व ईमारत कामगारांप्रमाणे सवलती देऊन त्यांची नोंदणी सरकारी कामगार अधिकार्यांकडे करावी व विविध सवलती द्याव्या अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या बैठकीत सिटूचे महेश दुबे, जानराव नागमोते यांनी मार्गदर्शन केले. आरीफा मस्जीद शेख या महिलेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बैठकीत टेलरींग कारागीर असलेल्या शंभराहून अधिक महिला उपस्थित झाल्या होत्या.
यावेळी महिला टेलरींग कामगारांना असंघटीत कामगारांचा दर्जा देऊन त्यांच्याकरिता स्वतंत्र कल्याणकारी मंडळ राज्य शासनाच्या कामगार विभागाने तयार करावे, सर्व महिला टेलरींग कारागिरांना मोफत आरोग्य सुविधा, सामाजिक सुरक्षा, विमा, प्रसुतीचे वेळी दहा हजार रुपयांचे अनुदान, मुलांच्या शिक्षणांत शिष्यवृत्ती, ६0 वर्षानंतर दरमहा १000 रुपये, वृद्धापकाळा नवृत्ती भत्ता देण्याबाबत चर्चा करण्यात आली. या मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, कामगार मंत्री, कामगार आयुक्त आदींना पाठविले आहे. कार्यक्रमाचे संचालन चंदा मगर यांनी केले तर आभार सुनंदा शेंडे यांनी मानले. कार्यक्रमाकरिता छाया मुरार, वैशाली उईके, रेखा मानकर, सरीता धुर्वे, रंजना भोयर, कलावती मडावी, सीता कुमरे, रंजना मडावी, मनीषा राऊत, सोनु कुमरे, अर्चना नागेश्वर, रजीया सौदागर, प्रतिभा सरमेखे, रंजना मसराम, संगीता कुमरे, मुनी पठाण, सनम शेख आदी कामगार महिला उपस्थित होत्या.(स्थानिक प्रतिनिधी)