विविध मागण्यांकरिता महिला रस्त्यावर
By Admin | Updated: December 11, 2015 02:32 IST2015-12-11T02:32:58+5:302015-12-11T02:32:58+5:30
जिल्ह्यात दारूबंदीमुळे अनेक समस्या बळावत आहेत. यामुळे पोलिसांनी जिल्ह्यात दारूबंदीची काटेकोर अंमलबजावणी करावी.

विविध मागण्यांकरिता महिला रस्त्यावर
जमिनीच्या पट्ट्यांसह दारू हद्दपारीकडे वेधले प्रशासनाचे लक्ष
वर्धा : जिल्ह्यात दारूबंदीमुळे अनेक समस्या बळावत आहेत. यामुळे पोलिसांनी जिल्ह्यात दारूबंदीची काटेकोर अंमलबजावणी करावी. तसेच अतिक्रमण करून राहणाऱ्यांना घराचे पट्टे देण्यात यावे, स्वत धान्य दुकानात तुरीची डाळ उपलब्ध करून द्यावी यासह अन्य मागण्यांना घेवून अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
मोर्चात सहभागी महिलांच्या एका शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. तत्पूवी मोर्चा जिल्हाकचेरीकडे जात असताना महिलांना जिल्हा न्यायालयाच्या आवाराजवळ अडविण्यात आले. यावेळी मोर्चात सहभागी मुंबई येथून आलेल्या मरियम ढवळे, संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष प्रभाताई घंगारे, जिल्हाध्यक्ष निर्मला वाघ यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांनी त्यांच्या हक्काकरिता एकत्र येत संघर्ष करण्याची गरज व्यक्त केली. यात कुणाचा विरोध झाल्यास त्याला धडा शिकविण्याबाबत मार्गदर्शन केले.
जनवादी महिला संघटनेचा हा मोर्चा मालगुजारी पूरा येथील संघटनेच्या कार्यालयातून निघाला. सदर मोर्चा बाजार परिसरातून जिल्हा कचेरीवर पोहोचला. यावेळी मोर्चात सहभागी महिलांनी जिल्ह्यात असफल ठरत असलेल्या दारूबंदी विरोधात नारे देत परिसर दणाणून सोडला. जिल्ह्यात दारूबंदी करण्याकरिता विविध गावात दारूबंदी महिला मंडळांची निर्मिती करण्यात आली असून त्यांना त्या भागातील पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
यासह अन्न सुरक्षा योजनेत खऱ्या गरजवंतांची नावे समाविष्ट करून नवीन शधिापत्रिकांचे वितरण करणे, अतिक्रमण करून घरे बांधून राहत असलेल्यांना जमिनीचे स्थायी पट्टे देण्यात यावे, प्रकल्पग्रस्त महिला शेतकऱ्यांना वीज, पाणी रस्ते आदि सुविधा देण्यात याव्या, वाढत्या महागाईवर आळा बसविण्यात यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. या मोर्चात जिल्ह्यातील विविध भागातील दारूबंदी महिला मंडळाच्या सदस्यांसह जनवादी महिला मंडळो सदस्य सहभागी होते.(प्रतिनिधी)
सर्व मंदिरात महिलांना असलेली प्रवेशबंदी हटवावी
महाराष्ट्रातील अनेक मोठी लहान मंदिरे उदा. शनिशिंगणापूर, त्र्यंबकेश्वर, आदी मंदिरात महिलांना प्रवेशबंदी आहे. शनिशिंगणापूर येथे एका महिलेने गाभाऱ्यांत जावून दर्शन घेतले म्हणून तेथील पुजाऱ्यांनी मूर्ती दुधाने धुवून काढली. हा महिलांचा अपमान असून ही बंदी हटविण्यात यावी, अशी मागणी या निवदेनातून करण्यात आली आहे.