शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

पोलिसांच्या जाळ्यात फसण्याच्या भीतीपोटी ‘नराधमा’ने केला ‘ती’चा गेम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2022 05:00 IST

आराेपी सतीश जोगे याने अवघ्या १४ वर्षीय मुलीला विवस्त्र करून तिचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना २१ रोजी उजेडात आली होती. सेवाग्राम पोलिसांनी २४ तासांत आरोपीला बेड्या ठोकून पोलीस कोठडी मिळविली. कोठडीदरम्यान त्याने अनेक धक्कादायक खुलासे पोलिसांसमोर केले. मृतक मुलगी आणि तिचा देवळी येथील ‘बॉयफ्रेंड’ ‘गणेश’ हे दोघं मिळून आरोपी सतीशला पोलिसांच्या जाळ्यात अडकविणार होते, याची चुणूक सतीशला लागली आणि सतीशने तिची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अल्पवयीन मुलीला विवस्त्र करीत तिचा मृतदेह पुरवून पुरावे नष्ट केल्याची धक्कादायक घटना पवनार येथे उघडकीस आली होती. आरोपी नराधम हा कारागृहात आहे. आरोपी नराधम सतीश याला  प्रेयसी आणि तिचा प्रियकर पोलिसांच्या जाळ्यात अडकविणार असल्याची भीती असल्याने ही क्रूर घटना करण्याचे पाऊल उचलल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. आराेपी सतीश जोगे याने अवघ्या १४ वर्षीय मुलीला विवस्त्र करून तिचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना २१ रोजी उजेडात आली होती. सेवाग्राम पोलिसांनी २४ तासांत आरोपीला बेड्या ठोकून पोलीस कोठडी मिळविली. कोठडीदरम्यान त्याने अनेक धक्कादायक खुलासे पोलिसांसमोर केले. मृतक मुलगी आणि तिचा देवळी येथील ‘बॉयफ्रेंड’ ‘गणेश’ हे दोघं मिळून आरोपी सतीशला पोलिसांच्या जाळ्यात अडकविणार होते, याची चुणूक सतीशला लागली आणि सतीशने तिची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. 

पवनार येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येबाबतचा सखोल तपास पोलीस करीत आहेत. आरोपीविरुद्ध पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून तो सध्या कारागृहात आहे. पोलीस तपासात विविध गंभीर बाबी पुढे आल्या आहेत. आरोपीवर यापूर्वीही पाॅक्सो कायद्यांतर्गत सिंदी (रेल्वे) पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहे.निलेश ब्राह्मणे, पोलीस निरीक्षक, सेवाग्राम

मृत प्रेयसीला दिला होता चोरीचा मोबाइल भेट -    आरोपी सतीश जोगे याने पवनार येथील नंदीघाट परिसरात फिरण्यास आलेल्या युवक आणि युवतीचा मोबाइल जबरीने हिसकावून घेतला होता. त्यातील एक मोबाइल त्याने मृतक प्रेयसीला दिला होता. त्यामुळे मृतक मुलगी आणि तिच्या दुसऱ्या प्रियकराने सतीशला पोलिसांत अडकविण्याचा प्लॅन आखला होता, त्यामुळे सतीशने तिचा खून केला. 

सतीश लिहायचा दिनचर्या...

-    आरोपी नराधम सतीश जाेगे याला दररोजची दिनचर्या लिहिण्याची सवय होती. त्याने मृतक मुलीला कसे मारले, काेणत्या कारणामुळे मारले, तसेच तिच्याशी केव्हा आणि कोठे संबंध बनविले आदी विविध गोष्टींची नोंद तो त्याच्याजवळील वहीत लिहून ठेवायचा, असे त्याच्या काही मित्रांनी पोलिसांना सांगितले. त्यावरून सतीशचे हे बिंग फुटले. 

सिंदी पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल आरोपी सतीश जाेगे याच्याविरुद्ध सिंदी रेल्वे पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असून याप्रकरणात सहा ते सात महिने त्याला कारागृहाची हवादेखील खावी लागली होती हे विशेष.

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी