तिचे कौतुक करायला वडीलच हयात नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 05:00 AM2020-08-05T05:00:00+5:302020-08-05T05:00:06+5:30

सकाळी तीन तास आणि रात्री पाच तास असा तिचा नियमित अभ्यास असायचा. शाळेत जाण्यासाठी तिला तीन किलोमीटर पायपीट करावी लागत असे. विज्ञान, इंग्रजी व गणित हे तिचे आवडते विषय. गणितात शंभरपैकी ९८ आणि इंग्रजीत १०० पैकी ९३ गुण मिळाले. विज्ञानात अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने ती पुनर्तपासणीसाठी बोर्डाकडे अर्ज सादर करणार आहे.

The father is not the only one to praise her! | तिचे कौतुक करायला वडीलच हयात नाहीत!

तिचे कौतुक करायला वडीलच हयात नाहीत!

Next
ठळक मुद्देगुणवंत विद्यार्थिनीची खंत : महिनाभरापूर्वीच वडिलांनी केली आत्महत्या

राजेश सोळंकी।
लोकमत न्यूज नेटवर्क
देउरवाडा/आर्वी : आर्वी तालुक्यातील बेनोडा (माटोडा) या गावात माती कुडाच्या घरात राहून सतत आठ तास अभ्यास करून शिकवणी वर्गाविना ९२.६० टक्के गुण शेतकऱ्याच्या मुलीने मिळविले. सर्व स्तरावरूनच तिचे कौतुक झाले. मात्र, तोंड भरून मनापासून कौतुक करणारे वडीलल हयात नसल्याने तिचे डोळे पाणावले.
निकिता सुखदेव तुमसरे रा. बेनोडा (माटोडा) असे या होतकरू मुलीचे नाव. तालुक्यातील नांदपूर येथील मॉडेल शाळेतील हुशार विद्यार्थिनी. वडिलांच्या कष्टाची, गरिबीची तिला जाणीव होती. सकाळी तीन तास आणि रात्री पाच तास असा तिचा नियमित अभ्यास असायचा. शाळेत जाण्यासाठी तिला तीन किलोमीटर पायपीट करावी लागत असे. विज्ञान, इंग्रजी व गणित हे तिचे आवडते विषय. गणितात शंभरपैकी ९८ आणि इंग्रजीत १०० पैकी ९३ गुण मिळाले. विज्ञानात अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने ती पुनर्तपासणीसाठी बोर्डाकडे अर्ज सादर करणार आहे.
झाले सुखदेवराव तुमसरे (४८) यांची साडेतीन एकर शेती आहे. लॉकडाऊनमध्ये शेतीसाठी त्यांनी हातउसने पैसे घेऊन कपाशीची पेरणी केली. बँकेचे कर्ज मिळाल्यावर सर्वांचे पैसे फेडू, असे त्यांनी ठरविले. त्यांचे मागील कर्ज माफ झाले होते. त्यांनी आर्वी येथील कोकण विदर्भ बँकेत कर्जासाठी कागदपत्रे सादर केली होती. मात्र कर्जप्रकरण रद्द झाले. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त होते त्यामुळे. ३० जूनला आर्वी तालुक्यातील जळगाव येथे नातेवाईकाचा विवाह सोहळा असल्याने कुटुंबातील सदस्य जळगावला गेले. हीच संधी साधत त्यांनी घरीच कीटकनाशक प्राशन केले. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. तेथून उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. ज्यावेळी मुलांना आधार पाहिजे, तेव्हाच वडील गेलेत. आता आईचे पाठबळच मुलामुलींमागे मागे आहे.
 

Web Title: The father is not the only one to praise her!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.