२७,१९९ मतदार ठरवतील २९ उमेदवारांचे भवितव्य

By Admin | Updated: February 21, 2017 01:08 IST2017-02-21T01:08:08+5:302017-02-21T01:08:08+5:30

जिल्हा परिषदेच्या मोरांगणा आणि वाठोडा जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होत आहे.

The fate of 29 candidates who have decided for 27,1 99 voters | २७,१९९ मतदार ठरवतील २९ उमेदवारांचे भवितव्य

२७,१९९ मतदार ठरवतील २९ उमेदवारांचे भवितव्य

वाठोडा व मोरांगणा या दोन गट व गणांसाठी आज मतदान
आर्वी : जिल्हा परिषदेच्या मोरांगणा आणि वाठोडा जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होत आहे. याकरिता मंगळवारी दि.२१ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत एकूण २९ उमेदवार रिंगणात आहेत. यातील १० जिल्हा परिषदेकरिता तर १९ पंचायत समितीकरिता आहेत. या मतदरांचे भवितव्य तब्बल २७ हजार मतदार ठरविणार आहेत.
दोन गावांच्या निवडणुकीकरिता तब्बल ३९ केंद्र असून या केंद्रावर ७८ इव्हीएम लावण्यात आले आहे. या कामाकरिता १५६ कर्मचारी कार्यरत आहेत. दोन गटात होणाऱ्या या निवडणुकीत वाठोडा जि.प. गटात पाच तर मोरांगणा गटात पाच उमेदवार रिंगणात आहे. वाठोडा जि.प. गटात १३ हजार ३९७ तर मोरांगणा गटात १३ हजार ८०२ मतदार आहेत. यादोन्ही गटासाठी ३९ मतदान केंद्रे असून एका मतदान केंद्रावर चार कर्मचारी व प्रत्येक केंद्रावर एक पोलीस व यासाठी चार भरारी पथके ठेवण्यात आल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजय पवार यांनी दिली. दोन्ही गट महिलांकरिता राखीव आहे. येथे नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर एबी फॉर्म परत घेण्याचा प्रकार घडला आहे. शिवाय प्रचाराकरिता जादा दिवस मिळाल्याने चांगलीच चुरस वाढली आहे.(तालुका प्रतिनिधी)

मतदान क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०१७ साठी दुसऱ्या टप्प्यासाठी आर्वी तालुक्यातील दोन गटांसाठी व चार गणासाठी मंगळवारी मतदान होत आहे. यासाठी संबंधित मतदान कार्यक्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात मोरांगणा व वाठोडा आणि काचनूर, मोरांगणा, देऊरवाडा व वाठोडा या गणासाठी मतदान होणार आहे.

Web Title: The fate of 29 candidates who have decided for 27,1 99 voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.