खुणावते फॅशनची अनोखी दुनिया
By Admin | Updated: June 14, 2014 23:48 IST2014-06-14T23:48:55+5:302014-06-14T23:48:55+5:30
फॅशनची दुनिया काही औरच आहे. नवनवीन ड्रेसेस, डिझायनर साडी, दागिने, चप्पल व शूज, पर्स आणि आणखी किती तरी. भारतातील फॅशन डिझायनर्सनी तर जागतिक यश प्राप्त केले आहे. रितू कुमार,

खुणावते फॅशनची अनोखी दुनिया
वर्र्धा : फॅशनची दुनिया काही औरच आहे. नवनवीन ड्रेसेस, डिझायनर साडी, दागिने, चप्पल व शूज, पर्स आणि आणखी किती तरी. भारतातील फॅशन डिझायनर्सनी तर जागतिक यश प्राप्त केले आहे. रितू कुमार, राघवेंद्र राठौर, रोहित बाल, रितू बेरी, रोहित गांधी, राहुल खन्ना, शंतनू आणि निखिल असे किती तरी फॅशन डिझायनर्स आहेत, ज्यांनी जागतिक कीर्ती प्राप्त केली आहे.
भारतातील वस्त्रनिर्मितीचा व्यवसाय प्रचंड प्रमाणात विस्तारत आहे. २००९ मध्ये ७६.३ मिलियन डॉलर्स एवढी निर्यात भारतातील उद्योगांनी केली आहे. भारतातील वस्त्र आणि कॉटन उद्योगाचा जीडीपीमध्ये ४ टक्के वाटा आहे. एकूण उत्पादन क्षेत्रापैकी १४ टक्के वाटा वस्त्र उत्पादनाने काबीज केला आहे. टेक्नॉलॉजी आणि गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग (वस्त्रनिर्मिती) मध्ये एकूण ३५ दशलक्ष मनुष्यबळ प्रत्यक्ष काम करीत असून, अप्रत्यक्ष ५४.८६ मिलियन मनुष्यबळ या उद्योगात कार्यरत आहे. म्हणजे एकूण ८९.८६ मिलियन मनुष्य असणारी ही फॅशनची दुनिया आहे. भारतातील जेवढी वस्त्रनिर्मिती होते त्यापैकी ६० टक्के माल हा यूएस, जपान, युरोपियन युनियन येथे निर्यात होतो. यावरूनच लक्षात येते की, फॅशन टेक्नॉलॉजी आणि गारमेंट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये करिअरच्या मोठ्या संधी आहेत. फॅशनच्या या दुनियेत उच्च दर्जाची फॅशन टार्गेटबरोबरच रेडी टू वेअर, स्पोर्ट वेअर, अॅक्सेसरीजमध्ये करिअरकरिता संधी आहे. डिझाइन अॅण्ड टेक्नॉलॉजी, लेदर अॅपिरिअल डिझाइन अॅण्ड टेक्नॉलॉजी, टेक्स्टाइल डिझाइन अॅण्ड डेव्हलपमेंट, फॅशन कम्युनिकेशन इत्यादी नवीन क्षेत्रे विस्तारत आहेत. फॅशन टेक्नॉलॉजीत कमी ग्राहकसंख्या असलेल्या फॅशनच्या वर्गाबरोबर होलसेल आणि इतर ग्राहकांसाठी वस्त्र व इतर फॅशन अॅक्सेसरीजची मागणी आहे. त्यामुळे फॅशन डिझायनिंग आणि गारमेंट्स बनविण्याच्या क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत.