कृषी साहित्य चोरीने शेतकरी धास्तावले

By Admin | Updated: November 23, 2015 01:50 IST2015-11-23T01:50:54+5:302015-11-23T01:50:54+5:30

रबी हंगाम सुरू होऊन जिल्ह्यात सर्वत्र पेरणीची लगबग सुरू झाली आहे. गारठा पडायलाही सुरुवात झाली आहे.

Farmers were afraid of stolen agricultural material | कृषी साहित्य चोरीने शेतकरी धास्तावले

कृषी साहित्य चोरीने शेतकरी धास्तावले

नुकसान भरपाईची मागणी : ऐन रबी हंगामात चोरीचे सत्र सुरू
वर्धा : रबी हंगाम सुरू होऊन जिल्ह्यात सर्वत्र पेरणीची लगबग सुरू झाली आहे. गारठा पडायलाही सुरुवात झाली आहे. अनेक भागात गहू, चना आदी पिकांच्या पेरण्या आटोपून ओलित करणेही सुरू झाले आहे. पण गारठ्याचा फायदा घेत शेतशिवारांमधून कृषिपंप, स्प्रिंल्करचे पितळी नोझल, डिपींमधील तांब्याच्या पट्ट्या, तेल आदी साहित्य चोरीचा सपाटा चोरट्यांनी सुरू केला आहे. त्यामुळे आधीच खरीपाने मोडकळीस आलेले शेतकरी या चोरींनी धास्तावले आहेत. शासनाने अश्या चोरींची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही केली जात आहे.
रबी हंगाम हा पूर्णपणे सिंचनावर अवलंबून असतो. त्यामुळे प्रकल्पातून सिंचनाची सोय असलेले शेतकरी तसेच विहीर व नदी, नाले जवळ असलेले शेतकरी रबीची पेरणी करीत असतात. सध्या चणा, गहू यासह भाजीपाला पिकांची लागवड करीत आहे. पिकांच्या वाढीसाठी पाणी देण्यासाठी सर्वाधिक आवश्यकता असते ती कृषिपंपाची. त्यामुळे खर्च करून शेतकरी कृषिपंप बसवितात. यासाठी २० ते २५ हजारांचा खर्च येतो. अनेक शेतकरी या काही वर्षात स्प्रिंक्लर व ड्रिपरच्या सहाय्यानेही ओलित करीत आहेत.
शेतकरी वर्गाला वीजवितरणचे भारनियमनचे वेळापत्रक पाहून पिकांना ओलित करावे लागते. सध्या केवळ लागवड झाली असल्याने रात्रीला सिंचन करण्याचे प्रमाण जरा कमी आहे. नेमका याचाच फायदा घेत वर्धा. देवळी, हिंगणघाट परिसरात शेतीसाहित्याची चोरी करणारे चोर सक्रीय झाले आहेत. शेतीपंप खोलून त्यातील तांब्याची तार व इतरही साहित्य चोरले जाते. तसेच स्प्रिंक्लर पाईपमधील पितळी नोझल चोरून नेले जातात. हा प्रकार या काही दिवसात वाढल्याने शेतकरी धास्तावले असून सिंचन कसे करावे हा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकरी याबाबत नजिकच्या पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवतात. परंतु चोरटे किती पोलिसांच्या हाती लागतात का हा प्रश्नच आहे. त्यामुळे अश्या चोऱ्या होऊ नये यासाठी ग्रामीण शेतशिवारांमध्ये पेट्रिलिंग व्हावी व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Farmers were afraid of stolen agricultural material

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.