शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मरणाच्या वाटेवर आम्ही सरण रचितो; पायाखाली आमच्या मरण तुडवितो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 17:04 IST

शेतकऱ्यांची व्यथा : कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी धाडसाला सलाम

प्रफुल्ल लुंगे लोकमत न्यूज नेटवर्क सेलू : पाठीवर १५ लिटरचा जहराचा डबा बांधून, पायाखाली मरण तुडवीत, अनेक भल्याभल्या संकटांना हुलकावण्या देत रामभरोसे जगणाऱ्या शेतकऱ्याला केवळ कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तळहातावर मरण घेऊन चालत राहावे लागते. हे चित्र एखाद्या एसीत राहणाऱ्या शहरी साहेबांनी खेड्यात येऊन पाहिले तर शेतकऱ्यांचा जीवनमरणाशी सुरू असलेला संघर्ष त्यांना अस्वस्थ केल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्याची ही व्यथा पाहून आपसूकच 'मरणाच्या वाटेवरती आम्ही सरण रचितो; पायाखाली आमच्या मृत्यू तुडवितो' ही शब्दरचना तोंडावर आल्याशिवाय राहत नाही.

कपाशी, सोयाबीनच्या पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव झाला. त्यासाठी कीटकनाशकाची फवारणी करावी लागते. अन्यथा पिकाऐवजी हाती पालापाचोळा येण्याची शक्यता असते. कंबरभर पिकात जमिनीवर काय आहे, हे दिसत नसताना पाठीवर कीटकनाशकाचा पंप घेऊन फवारणी करण्याचे धाडस कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी छातीवर दगड ठेवून शेतकरी करीत आहे. वाढलेल्या पिकामुळे जमीन दिसत नाही, मग जमिनीवर सरपटणारे विषारी प्राणी, साप, विंचू कसे दिसणार! तरीही पायाखाली मरण तुडवीत शेतकरी हे धोकादायक काम कसे करत असेल याचा विचार करायला कुणालाही वेळ नाही. चुकून दुर्दैवाने विषारी सापावर पाय पडला अन् दंश केला तर? ही कल्पनाही करणे शेतकऱ्यांच्या परिवाराला अत्यंत वेदनादायक ठरते. बायकापोरांना कधीतरी सुखाचे दिवस दाखवू, या भोळ्या आशेवर रात्रंदिवस मरणाशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांचा आता कुणावरही भरवसा राहिला नाही. कोणतेही राज्यकर्ते आले तरी शेतकऱ्याच्या पाचवीला दारिद्र्य पुजलेले आहे, हे मात्र खरे! 

हेच खरे शेतकऱ्याचे दुर्दैव कमरेपेक्षा जास्त वाढलेल्या पिकाची मशागत, फवारणी व इतर सर्व कामे जीव धोक्यात घालून शेतकऱ्याला करावी लागतात. शहरी लोकांना २४ तास वीजपुरवठा पाहिजे. शेतकऱ्यांना रात्रीचा वीजपुरवठा असतो. त्या अंधाऱ्या रात्री पिकात जीव धोक्यात घालून त्याला ओलीत करावे लागते. सरपटणारे प्राणी, हिंस्त्र प्राणी केव्हा जीवाचा लचका तोडतील, याचा नेम नसतो. शेतकरी रात्री शेतात गेल्यावर त्याची बायका, मुलं अस्वस्थ होऊन त्याला घरी येण्याची वाट पाहत असतात, खरंच त्यांना झोप लागत असेल का? त्याची कल्पना कुणीच करीत नाही. शेतात गेलेला नवरा किंवा बाप परत येईपर्यंत या सर्वांचा जीव भांड्यात पडलेला असतो. निर्दयी राज्यकर्त्यांना व शासनाला याबाबत चिंतन करायला व मार्ग काढायला वेळच नाही. एवढ्या परिश्रमाने पिकवलेल्या मालाला फुटाण्याच्या भावात विकावे लागते. तरी आमच्या शासन मायबापाला लाज वाटत नाही, हेच खरे शेतकऱ्याचे दुर्दैव आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र