शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी तणनाशक फवारले, दीडशे एकरांतील सोयाबीन जळाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 15:58 IST

कृषी विभाग बांधावर : आष्टीतील खडकी, किन्हाळा येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : तालुक्यातील खडकी व किन्हाळा या दोन गावांतील २६ शेतकऱ्यांनी सोयाबीनमध्ये वाढलेल्या तणावर तणनाशकाची फवारणी केली. पण, आठवडाभरातच सोयाबीनचे पीक जळाले. यामुळे शेतकरी धास्तावले असून, त्यांनी कृषिमंत्र्याकडे तक्रार केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत कृषी विभागाचे पथक दोन्ही गावांमध्ये दाखल झाले. पिकांची पाहणी करून तणनाशकाचे नमुने घेऊन प्रयोगशाळेला पाठविले. आता याच्या अहवालाची शेतकऱ्यांसह अधिकाऱ्यांनाही प्रतीक्षा आहे.

गेल्या महिनाभरापासून आष्टी तालुक्यात पावसाने चांगलाच कहर केला आहे. सततच्या पावसामुळे खरिपातील पिकामध्ये मोठ्या प्रमाणात तण वाढले. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी तणनाशकाचा वापर करून फवारणी सुरू केली. त्यामुळे खडकी व किन्हाळा येथील २६ शेतकऱ्यांनी 'क्युरॉन' नावाचे तणनाशक खडकी येथील कृषी सेवा केंद्रातून खरेदी करून त्याची फवारणी केली. फवारणीनंतर आठवडाभरानंतर शेतातील तण कायम राहून सोयाबीन जळाल्याचे निदर्शनास आले. या २६ शेतकऱ्यांची दीडशे एकरांतील सोयाबीन जळाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या शेतकऱ्यांनी कृषिमंत्री, वर्धा लोकसभा प्रमुख सुमित वानखडे, उपविभागीय कृषी अधिकारी आर्वी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वर्धा, तालुका कृषी अधिकारी आष्टी, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद वर्धा, मोहीम अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या. याची दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी देशमुख यांनी जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक, तालुका कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी आणि मोहीम अधिकारी जिल्हा परिषद वर्धा या चौघांना तत्काळ जळालेल्या सोयाबीनची पाहणी करून नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्याच्या सूचना दिल्यात. आता प्रयोगशाळेमधील अहवाल प्राप्त झाल्यानंतर सोयाबीन कशाने जळाली याचे निदान लावता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसानशेतकरी रोशन नागपुरे, संकेत नागपुरे, यशोदानंदन काबरा, मिलिंद उदापुरे, हिमांशू उदापुरे, मिलिंद मोरे, कुसुम पांडे, योगेश नागपुरे, मंदा शरद नागपुरे, सूरज कडू, शरद मोरे, सुरेंद्र नागपुरे, संगीता नागपुरे, अरविंद नागपुरे, पवन नागपुरे, आशा लांडगे, हेमंत ठाकरे, आशिष ठाकरे, प्रवीण ठाकरे, दिलीप इंगळे, किरण डोळस, प्रभाकर नागपुरे, शरद नागपुरे, संजय भिवापुरे, पुरुर्षोत्तम नागपुरे आणि प्रल्हाद डोळस या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, भरपाई देण्याची मागणी होत आहे.

"आम्ही शेतामध्ये तण वाढल्याने फवारणी केली. मात्र, हे तणनाशक सदोष असल्याने आमची सोयाबीन जळाली. अधिकाऱ्यांनी नमुने प्रयोगशाळेत पाठविले. अहवालाची वाट पाहणे सुरू आहे. आमचे आर्थिक उदरनिर्वाहाचे साधनच संपल्याने आता उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न पडला आहे. शासनाने तत्काळ आम्हाला न्याय द्यावा, अशी आमची मागणी आहे."- शुभम नागपुरे, शेतकरी खडकी.

"खडकी व किन्हाळा येथील मौजामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन जळाली तेथील नमुने घेऊन प्रयोगशाळेला पाठविले आहे. कीटकनाशक आणि तणनाशक या दोन्हीचे नमुने घेतले असून, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तपासाची पुढील दिशा ठरविता येईल."- दिगंबर साळे, तालुका कृषी अधिकारी, आष्टी (शहीद) 

टॅग्स :wardha-acवर्धाfarmingशेतीFertilizerखतेFarmerशेतकरी