लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सोयाबीन तारण कर्ज योजनेचा शुभारंभ झाला. या शुभारंभ प्रसंगी आनंद मांडवकर, आरंभा, सुरेश खेकारे तरोडा, तुळशीराम गौळकार सेलू, बळीराम नासर जामणी, मधुकर डंभारे धोच्ची व अमोल तुराळे चिंचोली या शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन तारण योजनेत ठेवले. समितीकडून सदर शेतकऱ्याचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.शुभारंभ प्रसंगी बोलताना सभापती अॅड. सुधीर कोठारी यांनी ज्या शेतकऱ्यांना पैशाची अडचण आहे. पण माल विकायचा नाही. तसेच माल साठवणुकीकरिता घरी जागेचा अभाव आहे. अशा शेतकऱ्यांनी आपले धान्य शेतमाल वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये साठवूक केल्यास दर मालाचे बाजारातील दर लक्षात घेऊन एकूण किंमतीच्या ७० टक्के पावेतो ६ टक्के व्याजदरावर वखार पावती गहाण करून बाजार समितीमार्फत तारण कर्ज अग्रीम दिल्या जाते. वखार पावतीवर बाजार समितीमार्फत दिलेले तारण कर्ज शेतकऱ्यांनी ६ महिन्याचे आत समितीकडे परतफेड केल्यास संबंधीत शेतकऱ्याला वखार महामंडळाचे गोदाम भाड्याची अर्धी रक्कम समितीमार्फत परत करण्यात येते. तसेच सदर मालाची शेतकरी स्वत: विक्री करू शकतो. बाजार समितीमार्फत शेतमाल तारण कर्ज योजना १९९२ पासून राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पणन मंडळाकडून समितीला गौरविण्यात आले आहे. मागील हंगाम सोयाबीन, तुर व चना या शेतमालाच्या अनुषंगाने समितीकडे ४१४ शेतकऱ्यांनी तारण योजनेमध्ये सहभाग नोंदविला होता. त्यापैकी १५६ शेतकºयांनी ७८०३ क्विंटल शेतमाल वखार महामंडळाचे गोदाममध्ये साठवणुक करून वखार पावतीवर समितीकडून रु. १, ६२, ९५, ००० ची कर्ज रक्कमेची उचल केली होती. तर समिती गोदाममध्ये सोयाबीन या शेतमालाची २५८ शेतकऱ्यांनी ९१४८ क्विंटल माल साठवणुक करून समितीकडून रु. १, ९७, ३३, ०००/- रक्कमेचे कर्ज उचल केले होते. समिती गोदामला मागील वर्षात साठवणुक करणाऱ्या शेतकऱ्यांना साधारणत: रु. ४०० ते ५०० प्रति क्विंटल दरामध्ये फायदा मिळाला आहे. सन २०१९-२० या चालु हंगामाकरिता आजच्या स्थितीत समितीकडून २८ शेतकऱ्यांनी १००५ क्विंटल सोयाबीन या शेतमालाची वखार महामंडळाच्या गोदाममध्ये साठवणुक करून सदर वखार पावतीवर रु. १९ लक्ष ५८ हजार तारण कर्जाची उचल केलेली आहे, अशी माहिती अॅड. कोठारी यांनी दिली.
शेतमाल तारण योजनेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 06:00 IST
शुभारंभ प्रसंगी बोलताना सभापती अॅड. सुधीर कोठारी यांनी ज्या शेतकऱ्यांना पैशाची अडचण आहे. पण माल विकायचा नाही. तसेच माल साठवणुकीकरिता घरी जागेचा अभाव आहे. अशा शेतकऱ्यांनी आपले धान्य शेतमाल वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये साठवूक केल्यास दर मालाचे बाजारातील दर लक्षात घेऊन एकूण किंमतीच्या ७० टक्के पावेतो ६ टक्के व्याजदरावर वखार पावती गहाण करून बाजार समितीमार्फत तारण कर्ज अग्रीम दिल्या जाते.
शेतमाल तारण योजनेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ठळक मुद्देसंडे अँकर । २०१९- २० मध्ये २८ शेतकऱ्यांनी घेतला सोयाबीन तारण कर्ज योजनेचा लाभ