शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी पुत्राने विकसित केले डवरणी यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 22:11 IST

घरची परिस्थिती बिकट असताना व नोकरीच्या मागे न लागता घरीच साहित्याची जुळवाजुळव करून वेळ व पैशाची बचत व्हावी म्हणून ह्यडवरणी व कल्टीवेटर यंत्राची निर्मिती आर्वी तालुक्यातील कासारखेडा येथील योगेश माणिकराव लिचडे यांनी केली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । एकरी एक लिटर डिझेलची क्षमता, पैशाची आणि वेळेचीही होतेय बचत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : घरची परिस्थिती बिकट असताना व नोकरीच्या मागे न लागता घरीच साहित्याची जुळवाजुळव करून वेळ व पैशाची बचत व्हावी म्हणून ह्यडवरणी व कल्टीवेटर यंत्राची निर्मिती आर्वी तालुक्यातील कासारखेडा येथील योगेश माणिकराव लिचडे यांनी केली आहे.अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हे यंत्र वरदान ठरणार आहे. साधारण शेतकऱ्यांकडे बैल जोडी नसते. पिकातील तण व्यवस्थापन करायचे असेल तर ९९ टक्के शेतकऱ्यांना दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. पिकातील दोन ओळीतील तण काढण्यासाठी जर वेळेवर डवरणी झाली नाही, तर मात्र तणाची वाढ होऊन पिकांची वाढ खुंटण्याचे प्रमाण वाढते.दिवसेंदिवस मजुराची संख्या कमी होत आहे. सोबतच मजुरीचे दरही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे ग्रामीण भागातील चित्र आहे. त्यामुळे शेती व्यवसाय तोट्याचा, न परवडणारा अशी नेहमी शेतकºयांची ओरड असते. मजूर न मिळाल्यामुळे वेळेवर शेतीची कामे होत नाहीत. बैलजोडी आणि मजूर यांची मजुरी ८५० रुपये द्यावी लागत होती. वेळ आणि पैसा याची बचत व्हावी म्हणून व शेतीची कामेही वेळेवर व्हावी हा विचार मनात ठेवून आधुनिकतेची कास धरत कृषी कन्या पॉवर कल्टीवेटर या नावाने उद्योग सुरू केला आहे. साधारणत: या यंत्रनिर्मितीकरिता १६ हजार रुपये खर्च आला आहे. एकरी १ लिटर डिझेल लागत असल्यामुळे पैशाची बचत होते. त्यामुळे या डवरणी यंत्राचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. विशेष म्हणजे, या डवरणी यंत्राच्या देखभालीची गरज नाही. त्याची पास बोथट झाली तरच त्याला धार लावावी लागते.पिकाच्या दोन ओळीतील डवरणी करताना यंत्राचा त्रास होत नाही, कारण याचे पुढचे चाक मोठे असून, सर्व भार त्या चाकावर येत असल्याने शक्ती कमी लागते. या यंत्राला चालविण्यासाठी केवळ एकाच मनुष्याची गरज भासते. पिकातील तण काढण्यासाठी शेतकऱ्यांना आता बैलजोडीचीही गरज भासणार नसून अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हे यंत्र वरदानच ठरणार आहे.योगेशचा झाला सन्मानमागील वर्षी नाशिक येथे आयोजित कृषीथॉन प्रदर्शनात योगेशचे डवरणी यंत्र प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. त्या यंत्राची दखल घेत योगेशला पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानितही करण्यात आले. दालनाला भेट देणाऱ्या मान्यवरांनी या यंत्राविषयी माहिती जाणून घेत योगेशच्या पाठीवर कौतुकाची थाप देत दिली. ग्रामीण भागातही अभियंता दडले असल्याची प्रतिक्रिया दिली. दिवसेंदिवस शेतीचा खर्च वाढत आहे. बऱ्याचवेळा मजुरांचा तुटवडा जाणवतो. मिळालेच तर मजुरीचे दर गगनाला भिडलेले असतात. अशा स्थितीत शेतकऱ्यांसाठी हे डवरणी यंत्र अत्यंत उपयोगी ठरेल, असा विश्वास योगेशने व्यक्त केला.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती