वर्धा येथे शेतकऱ्यांचे रास्तारोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 13:03 IST2018-06-02T13:03:11+5:302018-06-02T13:03:20+5:30
शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी वर्धालगतच्या रोठा येथे शेतकऱ्यांनी टायर जाळून रास्ता रोको केला. शिवाय रस्त्यावर काही प्रमाणात भाजीपाला टाकून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला.

वर्धा येथे शेतकऱ्यांचे रास्तारोको आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा- शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी वर्धालगतच्या रोठा येथे शेतकऱ्यांनी टायर जाळून रास्ता रोको केला. शिवाय रस्त्यावर काही प्रमाणात भाजीपाला टाकून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला. यावेळी गावातील शेतकरी उपस्थित होते.
शेतकरी आंदोलनाचा एक भाग म्हणून येथील किसान अधिकार अभियानच्यावतीने व विविध शेतकरी संघटनेच्या वतीने विविध शासकीय कार्यालयात बैठा सत्याग्रह सुरु करण्यात आला आहे. या सत्याग्रह दरम्यान ते गत चार वर्षात शेतकरी हिताकरिता काय योजना राबविल्या याची माहिती घेण्यात येत आहे. या नंतर सदर महितीच्या माध्यमातून पुन: आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अभियानचे अविनाश काकड़े यांनी दिली.