५ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन पैठणमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 04:58 PM2018-10-30T16:58:15+5:302018-10-30T16:59:16+5:30

२ व ३ फेब्रुवारी २०१९ रोजी संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद येथे दोन दिवसीय ५ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे.

Farmers literature Samelan in Paithan | ५ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन पैठणमध्ये

५ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन पैठणमध्ये

Next
ठळक मुद्देसंमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक कवी इंद्रजीत भालेराव यांची निवड

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कल्पनाविश्वात रमणाऱ्या आभासी शेतीसाहित्याचा शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती व्यवसायाला भेडसावणाऱ्या दाहक समस्यांची मराठी साहित्यविश्वाला जाणीव करून देण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेती अर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्य-सारस्वतांची कृषिजगतासोबत सांगड घालून त्यांना कर्तव्यपूतीर्साठी प्रेरित करण्यासाठी आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शथीर्चे प्रयत्न म्हणून २ व ३ फेब्रुवारी २०१९ रोजी संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद येथे दोन दिवसीय ५ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे.
पैठण येथील नियोजित संमेलनाचे अध्यक्षस्थान संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक तथा शेतकरी कवी इंद्रजीत भालेराव भूषविणार आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अ‍ॅड सतीश बोरुळकर, पैठण यांनी तर अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी ५ व्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.
या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणाऱ्या हौश्या-गौश्या-नवश्यांचा जमाव यापुरतेच केवळ मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्ताराठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि सशक्त लेखणीच्या माध्यमातून इंडियाच्या बरोबरीने भारतालाही समृद्ध व संपन्न करण्यासाठी हातात लेखणी घेऊन लढणाऱ्या लढवैया सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शथीर्चे प्रयत्न करण्याचा उद्देश या संमेलन आयोजनामागे आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात मुक्त बाजारव्यवस्थेत शेतीचे भवितव्य जनुकीय तंत्रज्ञान : शोध आणि बोध सनातन शेतीचा चक्रव्यूह कर्जमुक्ती शेतीची कि शेतकऱ्यांची? शेतीप्रधान साहित्य आणि साहित्यिक बदलती शेती, बदलती सरकार आणि लावू पणाला प्राण! अशा विविध विषयावरील एकूण ७ परिसंवाद राहणार आहे. या परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ आदी अनुभवी वक्ते भाग घेणार असल्याने हे या संमेलनाचे वैशिष्ट्यपूर्ण एवेगळेपण असणार आहे.

संमेलनात शेतकरी गझल मुशायरा व शेतकरी कवी संमेलन असे दोन स्वतंत्र सत्र ठेवण्यात आले असून या संमेलनात महाराष्ट्रासोबतच देश-विदेशातील १००० पेक्षा जास्त मराठी भाषिक प्रतिनिधी, नामवंत साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत सहभागी होतील, असा आम्हाला विश्वास आहे.
गंगाधर मुटे, कार्याध्यक्ष, ५ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन

Web Title: Farmers literature Samelan in Paithan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.