नाहरकतसाठी शेतकर्यांची अडवणूक
By Admin | Updated: May 19, 2014 23:49 IST2014-05-19T23:49:39+5:302014-05-19T23:49:39+5:30
येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज नसल्याचे दाखले (नो ड्यू सर्टिफिकेट) देण्यासाठी शेतकर्यांची अडवणूक सुरू केली आहे. एक रूपयाही कर्ज बाकी नसताना

नाहरकतसाठी शेतकर्यांची अडवणूक
सेलू : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज नसल्याचे दाखले (नो ड्यू सर्टिफिकेट) देण्यासाठी शेतकर्यांची अडवणूक सुरू केली आहे. एक रूपयाही कर्ज बाकी नसताना त्यांना तसे दाखले दिल्या जात नसल्याने ऐन शेतीच हंगामाच्या तोंडावर त्यांना इतर बँकेकडून कर्ज घेण्यासाठी अडचण जात आहे. शेतकर्यांनी सहकारी सोसायटीकडून कर्ज घेतलेले आहे. सोसायटीचे काही शेतकरी नियमित कर्जफेड करीत आले तर काही थकबाकीदार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सहकारी सोसायट्यांना कर्ज पुरवठा होतो व सोसायटी शेतकर्यांना देते यात सहकारी सोसायटीला काही टक्के कमिशन मिळते. ही प्रक्रिया आजवर नियमित सुरू होती. सद्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डबघाईस आली आता तर अवसायनात निघाली. काही शेतकर्यांनी आपल्याकडील कर्ज अशाही परिस्थितीत व्याजासह सहकारी सोसायटीला परत केले. कर्ज दिल्याबाबत रितसर पावती घेतली. सातबार्यावरून कर्जाचा बोझा उतरवून घेण्याबाबत पत्रही घेतले. सातबार्याकडून कर्जाचा बोझा कमीही करून घेतला. सहकारी सोसायटी नव्याने आता कर्ज देवू शकत नाही असे शेतकर्यांना माहीत असूनही कर्जफेड करण्याचे प्रामाणिक काम केले. आता राष्ट्रीयकृत बँकेतून पिककर्ज घेण्यासाठी नो ड्यू सर्र्टिफिकेट आणण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सेलू शाखेत शेतकरी गेल्यावर त्यांना नो ड्यू सर्र्टिफिकेट देण्यास नकार देण्यात येत आहे. याबाबत शेतकर्यांनी आपणाकडे सहकारी सोसायटीच्या कर्जापोटी एक रूपयाही बाकी नसल्याबाबत सांगितल्यावर आपण कर्जाची रक्कम सोसायटीत भरली. ती बँकेला आली नाही. सोसायटी परस्पर आपले कर्ज वसूल करून घेते व बँकेला भरीत नाही असे शेतकर्यांना सुनावण्यात येत आहे. असाच प्रकार धानोली येथील शेतकरी शरद भिंगारे यांच्याशी घडला. त्यांनी कर्जाची संपूर्ण रक्कम भरूनही त्यांना हेलपाटे मारायला लावले. सदर बाब सदर शेतकर्याने प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितल्यावर शाखा व्यवस्थापकाची चर्चा केली. शेतकर्यांना सहकारी सोसायटीमार्फत कर्जपुरवठा झाला. त्यामुळे त्यांनी ती रक्कम सोसायटीकडे जमा केली. सोसायटीला याबाबत बँकेने जाब विचारावा शेतकर्याला नो ड्यू सर्टीफिकेटसाठी कोणत्या आधारावर अडविता, असा प्रश्न केल्यावर त्याला नो ड्यू सर्टीफिकेट देण्यात आले. शेतकरी आधीच त्रस्त आहे. त्यात बँकेच्या आडमुठ्या धोरणाचा फटका त्याला अधिक वेदना देत आहे. सोसायटी आणि सहकारी बँकेच्या अंतर्गत व्यवहारात त्यांनी स्वत:हून पारदर्शकता आणण्याचे सोडून शेतकर्याची अडवणूक केल्या जात आहे. या प्रकारामुळे अनेक शेतकर्याकडे सहकारी सोसायटीचा एक पैसाही बाकी नसतांना त्यांना बँकेतून कर्ज नसल्याचे प्रमाणपत्र दिल्या जात नाही. यामुळे शेतकरी वैतागून गेला आहे. या प्रकारामुळे राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज घेण्याचा शेतकर्यांना मार्गात अडचण निर्माण केल्या जात असल्याने शेती हंगामाचा प्रश्न शेतकर्यांना सतावत आहे.(तालुका प्रतिनिधी)