जिल्हा बँकेत ठेवी अडकल्याने शेतकरी अडचणीत
By Admin | Updated: May 10, 2014 00:29 IST2014-05-10T00:29:25+5:302014-05-10T00:29:25+5:30
जिल्हा मध्यवर्ती बँकेत मागील २ वर्षांपासून जिल्ह्यातील २ लाख ४० हजार ठेविदारांचे ३४५ कोटी रूपये अडकले आहे. त्यामुळे अडचणीत ...

जिल्हा बँकेत ठेवी अडकल्याने शेतकरी अडचणीत
वर्र्धा : जिल्हा मध्यवर्ती बँकेत मागील २ वर्षांपासून जिल्ह्यातील २ लाख ४० हजार ठेविदारांचे ३४५ कोटी रूपये अडकले आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या ठेविदारांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन किसान अधिकार अभियानचे मुख्यप्रेरक अविनाश काकडे यांनी सेलू तालुक्यातील महाबळा, इटाळा, आजनगाव येथील ग्रामस्थांच्या सभामध्ये केले. यावेळी माहिती देताना अविनाश काकडे म्हणाले, राज्य शासनाच्या मदतीसाठी किसान अधिकार अभियानाने मागील वर्षी नागपूर येथील हिवाळी अधिवेशात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन देवून परिस्थितीची माहिती दिली. त्यांनी या प्रकरणाात सहकार्याची हमी दिली होती. त्यानंतर वर्तमान संचालक मंडळाने राजीनामे दिले व शासनाने प्रशासकाची नियुक्ती केली. सद्या प्रकरण प्रलंबित असून मोठ्या प्रमाणात ठेविदार तक्रारी नोंदवत आहेत. या गरजू ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटितपणे आंदोलन उभारण्याची गरज अविनाश काकडे यांनी यावेळी व्यक्त केली. किसान अधिकारचे जिल्हाध्यक्ष सुदाम पवार म्हणाले, आपल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कोणताही नेता पुढाकार घ्यायला घेताना दिसत नाही. त्यामुळे आता आपल्या प्रश्नासाथी स्वत:च जागरूक होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वर्धा तालुका अध्यक्ष भाऊराव काकडे यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. सभेचे आयोजन तालुक्याचे प्रमुख कार्यकर्ता विठ्ठल गुजरकर व प्रभाकर बजाईत यांनी केले. मोठ्या प्रमाणात ठेविदार नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढा यावेळी वाचला. यावेळी मनोहर महाकाळकर, भुजंग हाडके, सकु पंढरी, सिंध कावलकर, कमला कावलकर, कमला तेलरांधे, मनोज झाडे, अमीर उमाटे, देवराव बजाईत, नथ्थू चांभारे देवराव भावरकर, उत्तम कांबळे, भीमराव तडस, वामन देशमुख, सुभाष गुंडे, केशाव चांभारे भगवान चांभारे, प्रमोद ढुमणे उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)