शेतकऱ्यांची तहसीलवर धडक
By Admin | Updated: August 5, 2014 23:50 IST2014-08-05T23:50:09+5:302014-08-05T23:50:09+5:30
मागील वर्षी अतिवृष्टीने पिके बुडाली. यंदा पावसाच्या विलंबाने दुबार-तिबार पेरणी झाली. त्यातही बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला. यात शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने मदत देण्यात यावी,

शेतकऱ्यांची तहसीलवर धडक
समुद्रपूर : मागील वर्षी अतिवृष्टीने पिके बुडाली. यंदा पावसाच्या विलंबाने दुबार-तिबार पेरणी झाली. त्यातही बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला. यात शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने मदत देण्यात यावी, या मागणीकरिता तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी धडक दिली. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत विविध मागण्यांचे निवदेन तहसीलदारांना सादर दिले.
निवेदनात, ओल्या दुष्काळासह पुरात गेलेल्या पिकांची नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी. पीक विम्याची रक्कम एकाचवेळी देण्यात यावी. खरीप हंगाम कोरडा गेल्यामुळे शेकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्यात यावी. ग्रामीण रुग्णालयात आवश्यक सुविधा व सर्पदंशाकरिता लस पूरविण्यात यावी. तहसील चौकातील प्रवासी निवाऱ्यात स्वच्छतागृह बांधून देण्यात यावे. या मागण्यांचा समावेश होता. मोर्चात तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, सुभाष चौधरी, अतुल गुजरकर, कोमल बानाईत व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.(तालुका प्रतिनिधी)