कृषी यंत्र खरेदीसाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य
By Admin | Updated: February 4, 2016 02:19 IST2016-02-04T02:19:23+5:302016-02-04T02:19:23+5:30
राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण सेवेसाठी कृषी यंत्रसामग्री व उपकरणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य (अनुदान) देण्यात येणार आहे.

कृषी यंत्र खरेदीसाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य
वर्धा : राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण सेवेसाठी कृषी यंत्रसामग्री व उपकरणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य (अनुदान) देण्यात येणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी त्यांचे अर्ज संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह सादर करण्याच्या सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांनी दिल्या आहेत.
अवजारे मागणी अर्जासोबत ७/१२, ८ अ, आधार कार्ड, चायाचित्र, ओळखपत्राची स्वसाक्षांकित प्रत, बँक पासबुकच्या पहिल्या पृष्ठांची स्वसाक्षांकित प्रत व महाराष्ट राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाचे कोटेशन जोडणे आवश्यक आहे.
कृषी यंत्रसामग्री व उपकरणे खरेदीसाठी ट्रॅक्टर, पॉवर ट्रीलर, ट्रॅक्टर चलित अवजारे आदी मनुष्य, प्राणी चलित उपकरणे, पीक संरक्षण उपकरणे आदींसाठी अनुदान उपलब्ध आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प व अत्यल्प लाभधारक, महिला व इतर लाभार्थी शेतकऱ्यांसाठी कमाल अनुदान मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे.
निवड केलेल्या लाभाधारकांनी पूर्व संमती प्राप्त झाल्यानंतर खरेदी करावयाच्या यंत्र व औजारांची संपूर्ण रक्कम विभागीय व्यवस्थापक महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडे जमा करून यंत्र व अवजारांची खरेदी त्यांच्या पसंतीनुसार करावयाची आहे. खरेदी केलेल्या अवजारांची तपासणी संयुक्त तपासणी पथकाद्वारे करण्यात येईल. तपासणीनंतरच लाभाधारकास अनुदान देय राहील, अशी माहिती भारती यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती व मार्गदर्शक सूचना कृषीविभागाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तसेच तालुका कृषी अधिकारी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असेही कृषी अधीक्षक भारती त्यांनी सांगितले आहे.(शहर प्रतिनिधी)