शेतकरी पितापुत्रास ग्रेडरची मारहाण

By Admin | Updated: January 14, 2015 23:12 IST2015-01-14T23:12:25+5:302015-01-14T23:12:25+5:30

कापूस लावून घेण्यात व भाव देण्यावरून झालेल्या वादात शेतकरी पितापुत्रास मारहाण करण्यात आली. हा प्रकार येथील गुरुकृपा कॉटन मिल परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास घडला.

Farmer's father beat up the grader | शेतकरी पितापुत्रास ग्रेडरची मारहाण

शेतकरी पितापुत्रास ग्रेडरची मारहाण

मारहाण करणाऱ्यांना पोलिसांचे अभय : गुरुकृपा कॉटन जिनिंगमधील प्रकार
समुद्रपूर : कापूस लावून घेण्यात व भाव देण्यावरून झालेल्या वादात शेतकरी पितापुत्रास मारहाण करण्यात आली. हा प्रकार येथील गुरुकृपा कॉटन मिल परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलिसांनी त्यांची तक्रार न घेता मारहाण करणाऱ्यांची तक्रार घेत त्या पीडित शेतकरी पिता-पुत्राला सायंकाळी गजाआड केल्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला. यामुळे सर्वत्र संतप्त भावना व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, कानकाटी (कांढळी) येथील गुरूकृपा कॉटन जिनिंगमध्ये सीसीआयची कापूस खरेदी सुरू होती. चाकूर येथील शेतकरी देवराव कुबडे यांचा मुलगा संदीप याने दोन दिवसा अगोदर सदर जिनिंगमध्ये कापसाची बंडी आणली होती, परंतु कापूस लावून घेण्यास व भाव देण्यात संबंधित ग्रेडर शिवाजी पंडीत टाळाटाळ करीत असल्याचे समजते. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकरी पिता-पुत्राची ग्रेडरशी शाब्दिक चकमक उडाली. वादाचे पर्यवसान त्या पिता-पुत्रास हाणामारीत झाले. या दोन्ही शेतकऱ्यांना दोन ग्रेडर व जिन मालक व काटेवाले यांनी बेदम मारहाण केली. यात शेतकरी देवराव कुबडे यांच्या डोक्याला इजा झाली. सदर घटनेप्रकरणी पितापुत्र समुद्रपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांची तक्रार घेण्यास नकार दिला. उलट गे्रडरच्या तक्रारीवरून त्या शेतकरी पित्रा-पत्रावरच कलम ३५३, २२३, ३४ कलमान्वये कारवाई करीत दोघांनाही गजाआड करण्यात आले.
आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात न्याय मागायला गेलेल्या शेतकरी पितापुत्रावरच समुद्रपूर पोलिसांनी कारवाई केली. त्यामुळे सर्वत्र संतप्त प्रतिक्रीया उमटत असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Farmer's father beat up the grader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.