सिंचन विहिरीच्या रकमेकरिता शेतकरी भावंडांचे उपोषण

By Admin | Updated: September 29, 2015 03:34 IST2015-09-29T03:34:16+5:302015-09-29T03:34:16+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरीचे कुशल कामाचे देयक मिळण्यासाठी घोराड

Farmer's fasting fast for irrigation wells | सिंचन विहिरीच्या रकमेकरिता शेतकरी भावंडांचे उपोषण

सिंचन विहिरीच्या रकमेकरिता शेतकरी भावंडांचे उपोषण

सेलू : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरीचे कुशल कामाचे देयक मिळण्यासाठी घोराड येथील शेतकरी पंढरी केशव धोंगडे व त्यांच्या भावाने सोमवारपासून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाकडे दुर्लक्ष झाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा या शेतकऱ्याने दिला आहे.
घोराड ग्रामपंचायतीच्या १५ आॅगस्ट २०१४ रोजी झालेल्या ग्रामसभेत सदर शेतकऱ्याची विहीर मंजूर झाल्याचा ठराव घेण्यात आला. वैयक्तिक सिंचन विहीर ठरावाच्या यादीत पंढरी धोंगडे यांचे नाव सहाव्या क्रमांकावर आहे. या विहिरीला प्रशासकीय व तांत्रिक आदेशाची मंजुरी शासनस्तरावरून १० मार्च २०१५ रोजी मिळाली. संबधित विभागाच्या अभियंताच्या देखरेखेखाली विहिरीचे काम पूर्ण झाल्यानंतर अकुशल कामाचे देयक पंचायत समिती स्तरावरून मिळाले. कुशल कामाच्या देयकावर स्वाक्षरी करण्यास मात्र सरपंचानी नकार दिला. या संदर्भात सदर शेतकऱ्याने पंचायत समिती, जिल्हा परिषद, खासदार, आमदार व आयुक्ताकडे निवेदन दिले.
यात त्यांनी सदर निवदेन मुख्यमंत्र्यांनाही पाठविले. मात्र त्यांच्या निवेदनाकडे साऱ्यांचे दुर्लक्ष झाल्यावर पंढरी धोंगडे व त्याचा भाऊ विठ्ठल धोंगडे या दोघांपी पं.स. कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. वैयक्तिक सिंचन विहिरीच्या कुशल देयकावर सरपंचाने स्वाक्षरी न केल्यामुळे रक्कम आजपर्यंत मिळाली नाही. यामुळे मुंबई ग्रामपंचायतीच्या अधिनियमानुसार १९५८ च्या कलम ३९ नुसार सरपंचावर कारवाई करीत कुशल बिलाची रक्कम तात्काळ देण्यात यावी, अशी मागणी या शेतकरी भावंडांची आहे.(शहर प्रतिनिधी)

ग्रा.पं. सदस्यांचेही १८ मुद्यांच्या चौकशीकरिता साखळी उपोषण
४या शेतकऱ्यांच्या उपोषणाबरोबरच गावातील महेंद्र माहुरे, प्रमोद तेलरांधे व ग्रा.पं. सदस्यांनी याच उपोषण मंडपात ग्रामपंचायत विरोधात १८ मुद्यांवर चौकशीची मागणी करीत साखळी उपोषण सुरू केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रामकृष्ण उमाटे, पं.स. सदस्य उल्हास रणनवरे आदींनी प्रकरणाची माहिती घेतली.

कुठल्याही क्षणी आत्महत्या
ग्रामपंचायतीच्या राजकारणामुळे राजकीय सुडबुद्धीने वैयक्तिक सिंचन विहिरीचे कुशल बील देण्यास सरपंच टाळाटाळ करीत आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास कोणत्याही क्षणी मी आत्महत्या कारणार.
- पंढरी धोंगडे, पीडित शेतकरी, घोराड

Web Title: Farmer's fasting fast for irrigation wells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.