शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

सोयाबीनला भाव मिळाला तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 16:55 IST

परतीच्या पावसाचा तडाखा : अस्मानी, सुलतानी संकटाचे ग्रहण

विनोद घोडे लोकमत न्यूज नेटवर्क चिकणी (जामनी): दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या हिंगणघाट येथे धान्याची व सोयाबीनची काही मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. पण इतर धान्याची विशेष आवक नाहीत, हे मात्र तितकेच खरे. शेतकरी ही सोयाबीन विकून दिवाळी साजरी करण्याच्या तयारीत आहेत पण, चांगला भाव मिळाला तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आला आहे, शेतकऱ्यांनी मागील वर्षीच्या उत्पादनातून शिल्लक राहिलेले काही धान्य, कडधान्य साठवून ठेवले होते. पण निसर्गाच्या अनियमितपणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या लागवड खर्चासाठी घरी साठवून ठेवलेले उत्पादन मिळेल त्या भावात विकावे लागले. यामुळे आता दिवाळी सण तोंडावर आला असताना बाजार समितीत धान्याची आवक दिसून येत नाही. आता शेतकऱ्यांना नव्या सोयाबीनवरच अवलंबून राहावे लागत आहे. यंदा ऑक्टोबर महिना अर्धा उलटून गेला तरी वरुणराजा शांत व्हायचे नाव घेत नसल्याने सोयाबीन उत्पादकांना सोयाबीनचे उत्पादन घरी आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. हल्ली जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे सोयाबीन सवंगणीला आले आहेत. तर ज्यांचे सोयाबीन मळणीला आले आहे त्यांना वरुणराजा सतावत आहे. 

आता दिवाळी साजरी कशी करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. जिल्ह्यातील ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन घरी आले खरे पण सततच्या पावसाने तेही काळवंडले व बारीक झाले आहे. यामुळे उताराही चांगलाच घटला असून हल्ली प्रति एकर २ ते ३ क्विंटलचा उतारा मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. 

शेतकऱ्यांची दिवाळी अडचणीत"यावर्षी अतिप्रमाणात पडलेल्या पावसामुळे खरिपातील उभ्या पिकांची पुरती वाट लागली. यातून बचावलेले पीक वाचवण्यासाठी कर्ज काढून खर्च केला. पण आताही सतत पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीन घरी येते की नाही, अशी भीती निर्माण झाली आहे. आता दिवाळी साजरी कशी करावी, ही मोठी समस्या निर्माण झाली आहे." - मनीष येणकर, शेतकरी

"पावसाच्या तावडीतून कसेबसे सोयाबीनची मळणी केली व उत्पादन घरी आणले. पण यामध्ये अधिक प्रमाणात ओलावा असल्याने याला वाळविण्यासाठी नाकात दम आला आहे. दिवाळीच्या पूर्वी हे सोयाबीन विक्री योग्य होते की नाही. याची शास्वती नाही. उत्पादनातही घट आल्याने यंदाची दिवाळी अंधारातच जाण्याची शक्यता आहे." - प्रवीण भोयर, शेतकरी

"अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे यंदाच्या सोयाबीनमध्ये अधिक प्रमाणात ओलावा आहेत, हे जरी सत्य असले तरी पण सोयाबीनचे भाव आधीच घसरले होते हेही तितकेच खरे आहे. तसेही शेतमालाच्या दरात चढ-उतार सुरूच असतो. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पाहिजे त्या प्रमाणात आवक नाही."- विक्की उमरे, व्यापारी

व्यापारी काय म्हणतात... "सोयाबीनचे दर आता जरी घसरले असेल तरी पुढे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी गरजेपुरते सोयाबीन विकावे. पूर्ण माल एकदाच न विकता टप्प्याटप्प्याने विकणे फायद्याचे ठरू शकतील. शेतकऱ्यांनी बाजारांचाही अंदाज घ्यावा."- प्रमोद ठाकरे, व्यापारी

टॅग्स :wardha-acवर्धाfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र