शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात शेतकऱ्यांचा असंतोष उफाळला: पाणंद रस्ता न मिळाल्यास रेल्वे रोखणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 18:44 IST

वर्धा-नांदेड रेल्वेमुळे अडकले शेतकरी : संतप्त शेतकऱ्यांचा रेल रोकोचा इशारा!

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा-नांदेड रेल्वे मार्गाच्या कामात सालोड (हिरापूर) येथून नागठाणाकडे जाणारा पाणंद रस्ता रेल्वेकामात बंद झाला. शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याने रेल्वे विभागाने रेल्वे क्रॉसिंगलगत पाणंद रस्ता देत खडीकरणाचे आश्वासन दिले होते. मात्र, याला दोन वर्षांचा कार्यकाळ लोटला, तरी खडीकणाच्या कामासाठी साधी खडीही पडली नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

वर्धा-नांदेड या रेल्वे मार्गाचेकळंबपर्यंत काम पूर्ण झाले. या मार्गावर रेल्वेगाडीही सुरू झाली आहे. या मार्गावर सालोड (हिरापूर)-पुलगाव मार्गावर रेल्वे क्रॉसिंग आहे. या क्रॉसिंगपासून नागठाणा येथे रस्ता जातो. या कामात हा पाणंद रस्ता बंद केला होता. वहिवाटीचा प्रश्न उ‌द्भवल्याने शेतकऱ्यांनी सुरुवातीला अर्ज, निवेदन देऊन पाणंद रस्ता देण्याची मागणी केली होती. मात्र, रेल्वे प्रशासन निवेदनाला गंभीरतेने घेत नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. रेल्वे क्रॉसिंगपासून शेतकऱ्यांना रस्ता देत नागठाण्यापर्यंत या नव्या पाणंद रस्त्याचे खडीकरण करून देण्याचे आश्वासन दिले होते. पण, या गोष्टीला आता दोन वर्षाचा काळ लोटून सुद्धा कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. आता खरीप हंगाम तोंडावर असून, मार्गाने जाणे अवघड झाले आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून तसा इशाराही रेल्वे प्रशासनाला दिला आहे.

...तर रेल रोको आंदोलनपाणंद रस्त्याच्या खडीकरणासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी रेल्वे विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, प्रशासनाकडून रस्ता खडीकरणासाठी कोणतीही हालचाल होताना दिसून येत नाही. त्यामुळे संतापलेल्या सालोड, भैव्यापूर, श्यामपूर या शिवारातील शेतकऱ्यांनी वर्धा ते कळबपर्यंत सुरू असलेली रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच शेतकरीही संतप्त झाले आहे. 

दोनशे शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा प्रश्न बिकट, हंगामाला सुरुवात

  • या पाणंद रस्त्यावर भैयापूर, शामपूर या शेतशिवारात सालोड हिरापूर येथील किमान २०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांची शेती आहे.
  • शेतकऱ्यांनी अडवणूक केली, तेव्हा आश्वासन दिले होते. मात्र, गत दोन वर्षांत कामासाठी साधी घडीही पडली नाही. 
  • गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वेचे अधिकारी या ठिकाणी या रस्त्याची पाहणी करून गेले. पुन्हा तेच आश्वासन देत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्यात आली, मात्र पावसाळा तोंडावर असून, अद्याप कामाला सुरुवात झाली नाही. शेतात बी बियाणे न्यावी कशी, पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे.
टॅग्स :wardha-acवर्धाFarmerशेतकरी