रबी हंगामावरच शेतकऱ्यांची भिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 05:00 AM2020-10-25T05:00:00+5:302020-10-25T05:00:22+5:30

सोयाबीन पीक हातून गेले असतानाही कपाशीवर असलेली शेतकऱ्यांची भीस्त आता बोंडअळीने शिरकाव केल्याने शेतकऱ्यांसमोर पुन्हा मोठे संकट ओढावले असून हतबल होण्याची वेळ आली आहे. कोलगाव शिवारात असलेल्या बागायती पाच एकर शेतीत युवा शेतकरी पराग वैरागडे यांनी कपाशी पिकाची लागवड केली. पीक बहरले अधिकाधिक उत्पादनाची आशा बाळगून असलेल्या या युवा शेतकऱ्याने शेतात कपाशीचे बोंड फोडून पहिले असता त्यात बोंडअळी दिसून आली.

Farmers depend on rabi season only | रबी हंगामावरच शेतकऱ्यांची भिस्त

रबी हंगामावरच शेतकऱ्यांची भिस्त

googlenewsNext
ठळक मुद्देसंकट, खरीपात झाले मोठे नुकसान । आर्थिक गणित विस्कटले

लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : दसरा, दिवाळी सणाला लागणार खर्च तसेच रबीची पेरणी खरिपातील पिकांवर अवलंबून असते ते नुकसानीचे जरी ठरले असले तरी आर्थिक नुकसान उराशी बाळगून शेतकऱ्यांनी आता रबी हंगामावर भिस्त आहे.
एकरी सोयाबीनचे उत्पादन पाच क्विंटलच्या वर गेले नाही तर एकरी उत्पादनाची मालिका शुण्यापासून सुरू झाली असून ती चार,पाचवरच थांबली. यातही भाव वाढतील, अशी आशा दिसत असली तरी सोयाबीन घरी साठवून ठेवण्याची परिस्थिती नाही. बाजारात ४२०० रुपये भावाचा आकडा असला तरी १८०० रुपयांपासून खरेदी केली जात आहे. सरासरी भाव पहिला तर हा ३ हजारावर स्थिरावत आहे. यावर्षी असलेला सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात होता. सध्या कापूस वेचाणीला प्रारंभ झाला असून दिवाळी अगोदर शेतकऱ्याच्या घरी पांढर सोन असणार आहे. पण बोंडअळीने शिरकाव केल्याने हे पीक अधांतरी आले आहे.
अशातच समोर असलेली रब्बीची पेरणी पाहता यासाठी येणाऱ्या खर्चाला आर्थिक बळ आणावे कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
असे असले तरी शेतकरी पुन्हा मशागती व रब्बीच्या पेरणीला सामोरे जात आहे.
शासनाने शेती व्यवसायाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

कर्जमुक्ती ठरली कागदावर
शेतकऱ्यांवर आलेले संकट पाहता तसेच दुष्काळाची गडद छाया असल्याने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला. मात्र, २०१३ चे कर्ज घेतले असणारे शेतकरी अजूनही कर्जमुक्त झाले नसून कर्जमुक्ती कागदावरच राहिली असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

कोलगाव शिवारात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव
सोयाबीन पीक हातून गेले असतानाही कपाशीवर असलेली शेतकऱ्यांची भीस्त आता बोंडअळीने शिरकाव केल्याने शेतकऱ्यांसमोर पुन्हा मोठे संकट ओढावले असून हतबल होण्याची वेळ आली आहे. कोलगाव शिवारात असलेल्या बागायती पाच एकर शेतीत युवा शेतकरी पराग वैरागडे यांनी कपाशी पिकाची लागवड केली. पीक बहरले अधिकाधिक उत्पादनाची आशा बाळगून असलेल्या या युवा शेतकऱ्याने शेतात कपाशीचे बोंड फोडून पहिले असता त्यात बोंडअळी दिसून आली. त्यामुळे आता कपाशीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाला मुकावे लागते की काय, अशी चिंता निर्माण झाली आहे. कृषी विभागाने शेताची पाहणी करून मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे. शेतात बोंडअळी आढळल्याने आता कपाशीवरही बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट आले आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

Web Title: Farmers depend on rabi season only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.