शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

कीटकनाशकाची फवारणी करताना आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू, आष्टी तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 15:26 IST

आष्टी(शहीद)तालुक्यातील धाडी येथील अत्यल्प भूधारक शेतकरी हंसराज मारोतराव मनोटे वय 32 याची फवारणी दरम्यान अचानक प्रकृती बिघडली.

वर्धा - आष्टी(शहीद)तालुक्यातील धाडी येथील अत्यल्प भूधारक शेतकरी हंसराज मारोतराव मनोटे वय 32 याची फवारणी दरम्यान अचानक प्रकृती बिघडली त्यांना आष्टीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले. सदर घटना आज सकाळी 8 वाजता घडली

नेहमीप्रमाणे हंसराज हे दुसऱ्याच्या शेतात फवारणीच्या कामावर गेले होते त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले, डोळे लाल झाले होते तर तोंड सुजले त्यामुळे थोडा आराम केला असता त्यांना घरी नेले मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने आष्टीला नेण्यात आले डॉक्टरांनी मृत घोषित केले, त्यांच्या मागे पत्नी 2 मुले असा परिवार आहे. त्यांच्याकडे 1 एकर एवढीच शेती आहे. 60 हजार रुपयांचे कर्ज आहे अचानक मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे.

यवतमाळ व अकोला जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनवरील कीटकनाशकांच्या फवारणीदरम्यान विषबाधेमुळे झालेल्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या मृत्यूप्रकरणी विभागीय महसूल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय विशेष चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आली. कृषी विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी केला.

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील या समितीत अमरावतीचे विशेष पोलीस महासंचालक, आरोग्य सहसंचालक, विभागीय कृषी संचालक सदस्य असतील. याशिवाय डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक आणि फरिदाबाद येथील प्लान्ट प्रोटेक्शनचे प्रतिनिधी अशा सात जणांचा समावेश असणार आहे. याशिवाय तज्ज्ञ व्यक्तींना निमंत्रित सदस्य म्हणून बोलाविण्याचा अधिकार एसआयटीच्या अध्यक्षांना देण्यात आला आहे.

शेतक-यांच्या मृत्यूप्रकरणी कारणीभूत जबाबदार घटक नक्की करणे, अशा प्रकारच्या आपत्तींवर प्रतिबंधासाठी कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करताना घडलेल्या चुका, त्याकरिता जबाबदार व्यक्ती, संस्था निश्चित करणे, चिनी स्प्रेवरील बंदीबाबत शिफारस करणे, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली असून, समितीला तीन आठवड्यांत आपला अहवाल सादर करायचा आहे.