कागदपत्रे पूर्ततेच्या चक्रव्यूहात शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 05:00 AM2020-05-15T05:00:00+5:302020-05-15T05:00:23+5:30

आवश्यक कागदपत्रांच्या पुर्ततेअभावी शेतकऱ्यांनी पीक कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे. तलाठी कोविड-१९ च्या बंदोबस्तात असल्याने आपल्या साझ्यावर जाऊ शकत नाही तसेच त्याशिवाय कागदपत्रांची पुर्तता होवू शकत नसल्याने कागदपत्रांच्या पुर्ततेच्या चक्रव्यूहात शेतकरी अडकल्याचे दिसून येत आहे.

Farmers in the cycle of paperwork fulfillment | कागदपत्रे पूर्ततेच्या चक्रव्यूहात शेतकरी

कागदपत्रे पूर्ततेच्या चक्रव्यूहात शेतकरी

Next
ठळक मुद्देपीककर्ज मिळण्यात अडचण : लॉकडाऊनमुळे तलाठीही अनुपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनार : येत्या दहा दिवसांवर खरिप हंगाम येऊन ठेपला आहे. परंतु, आवश्यक कागदपत्रांच्या पुर्ततेअभावी शेतकऱ्यांनी पीक कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे. तलाठी कोविड-१९ च्या बंदोबस्तात असल्याने आपल्या साझ्यावर जाऊ शकत नाही तसेच त्याशिवाय कागदपत्रांची पुर्तता होवू शकत नसल्याने कागदपत्रांच्या पुर्ततेच्या चक्रव्यूहात शेतकरी अडकल्याचे दिसून येत आहे.
पाच मे रोजी तहसीलदारांनी ऑनलाईन सातबारा, आठ अ उताऱ्यावर पीककर्ज देण्याचा आदेश काढला. त्यावर केवळ रेग्यूलर कर्जदारांनाच पिककर्ज मिळू शकते. जे थकीत होते, शासनाच्या कर्जमाफीमुळे पीक कर्जास पात्र ठरले तसेच जे नव्याने कर्ज घेणारे आहे. त्यांना सातबारा, आठ अ व्यतिरिक्त नकाशा, चतु:सिमा, फेरफार पंजी, हैसियत प्रमाणपत्र, स्टॅम्प शपथपत्र आदी कागदपत्रांची पुर्तता केल्याशिवाय कर्ज मिळणार नसल्याचे सांगितले.
पवनार येथील सेंट्रल बॅँक ऑफ इंडिया शाखेत सोळाशेवर खातेदार आहे. तर नियमित कर्जदार केवळ दोनशेच्या घरात आहे. जर आवश्यक कागदपत्र मिळाली नाही तर त्यांना कर्जपुरवठा होणार नाही.
लॉकडाऊनमुळे शेतमाल घरीज आहे. हमी भावात विकलेल्या तुरीचे, कापसाचे अजून चुकारे मिळाले नाही. भाजीपाला कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे.
पीक कर्ज मिळत नसून खरिपाच्या पेरणीकरिता बि-बियाणे, खतांचे व्यवस्थापन कसे करावे, याच विवंचनेत शेतकरी आहे. तलाठ्यांना कोविड- १९ च्या बंदोबस्तातून मोकळे करून आपआपल्या साझ्यात पाठविणे गरजेचे आहे. तत्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांना कागदपत्रांचा मार्ग सुकर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

प्रकरणे मंजूर करण्यासंदर्भात व्यवस्थापकांना विनंती केली. कोविड-१९ मधून बाहेर निघाल्यानंतर राहिलेले कागदपत्र घ्यावे असा आग्रह केला. पण, व्यवस्थापकांनी याचा अधिकार मला नसल्याचे सांगितले. त्यामुळे यासंदर्भात जिल्हाधिकारी, तहसीलदारांना निवेदन देणार आहे.
- शालिनी आदमने, सरपंच ग्रा.पं. पवनार.

नियमित कर्जदारांना ऑनलाईन सातबारा, आठ-अ वर कर्जपुरवठा सुरू आहे. पण, थकीत व नवीन शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पुर्तता करणे गरजेचे आहे. त्याशिवाय कर्ज प्रकरण मंजूर करता येणार नाही.
- लोणकर, व्यवस्थापक, सेंट्रल बॅँक ऑफ इंडिया.

तहसीलदारांच्या आदेशान्वये सातबारा, आठ अ (ऑनलाईन) उताऱ्यावर कर्ज प्रकरणे मंजूर करण्यासंदर्भात बॅँक व्यवस्थापकाशी चर्चा केली. परंतु, बॅँकेचे सर्क्युलरनुसार कागदपत्रं आवश्यक असून त्याशिवाय कर्ज प्रकरणे मंजूर होणार नाही.
- संजय भोयर, तलाठी, पवनार.

Web Title: Farmers in the cycle of paperwork fulfillment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी