शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
5
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
6
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
7
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
10
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
11
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
12
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
13
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
14
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
15
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
16
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
17
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
18
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
19
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
20
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात आठ शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:00 IST

बोंडअळीने प्रभावित शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणाही केली. मात्र, जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. नववर्षात जानेवारी महिन्यात तब्बल ८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून शेतकरी आत्महत्यांचे सत्र अजूनही सुरूच आहे. त्यामुळे हा लाभ शेतकºयांपर्यंत पोहोचत आहे का? हा मोठा प्रश्न आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांवरील संकट गडदच। शासकीय योजनांचा लाभही कुचकामी

चैतन्य जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सरकारने कर्जमाफी जाहीर केली. हमीभाव देत असल्याचा दावाही केला जात आहे. बोंडअळीने प्रभावित शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणाही केली. मात्र, जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. नववर्षात जानेवारी महिन्यात तब्बल ८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून शेतकरी आत्महत्यांचे सत्र अजूनही सुरूच आहे. त्यामुळे हा लाभ शेतकºयांपर्यंत पोहोचत आहे का? हा मोठा प्रश्न आहे.मोदी सरकारने निवडणुकांपूर्वी स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्याच आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. यासाठी विविध आंदोलने झाली. मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. अस्मानी आणि सुल्तानी संकटांना तोंड देत बळीराजा जे काही पिकवतो, त्याला कवडीमोल भाव मिळतो. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य कधीही मिळत नाही. गारपीट, रोगांचा प्रादुर्भाव, अवकाळी पाऊस, पाणीटंचाई अशा विविध संकटांना तोंड देत पिकविलेला भाजीपाला कवडीमोल भावाने विकला जात असेल, तर ते शेतकऱ्यांसाठी संतापजनक ठरणे स्वाभाविक आहे. सरकारने शेतकरी सन्मान योजना, कर्जमाफी योजना आदी विविध योजना आणल्या. आधीच अस्मानी आणि सुल्तानी संकटात शेतकरी सापडला असताना सध्या शेतकरी विविध योजनांच्या सभोवताल घिरट्या घालताना दिसून येतो. मागीलवर्षी कोरडा दुष्काळ आणि आता ओल्या दुष्काळाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. ओल्या दुष्काळाने शेतकºयांनी दुबार, तिबार पेरणी केली. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची उभी पिके नष्ट झाली. यात शेतकरी मेटाकुटीला आला. शेतीच्या भरवशावर असलेल्या शेतकऱ्यांना संसाराचा गाडा कसा हाकावा, याची चिंता पडली आहे. यातच बँकांचे कर्ज कसे फेडावे, याच विवंचनेत ते राहतात. सरकारने जरी शेतकºयांच्या हिताच्या योजना आणल्या पण, याचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांची फरपट होतानाच दिसत आहे.जानेवारी महिन्यात गिरड येथील शेतकरी प्रमोद नासुराम मेश्रे (३५), अनिल प्रल्हाद गावंडे (३५) रा. वायगाव, कैलास पंडितसिंह चव्हाण (४२) रा. मोई, चिरकुट रामराव कोटकारे (५५) रा. उमरी ता. कारंजा, अनिल पंजाबराव ईवनाते (३२) रा. बेलगाव, मारोती ज्ञानेश्वर सोनटक्के (३२) रा. पानवाडी, देवराव चंपतराव मेंढे (६६) रा. लोणी या आठ शेतकºयांनी कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केली.

टॅग्स :Farmerशेतकरी