शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

शेतकऱ्यांनो सावधान ! पीएम किसान सन्मान' योजना 'अपडेट'च्या नावाखाली होत आहेत स्कॅम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 17:10 IST

Wardha : सायबर सेलकडे तक्रारींचा खच शेतकऱ्यांनी फसव्या लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : केंद्र सरकारकडून चालविल्या जाणाऱ्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेद्वारा पात्र शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा दिला जातो. मात्र, याच योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. या योजनेचे खाते अपडेट करा म्हणून लिंकचा मेसेज येतो आणि शेतकऱ्यांच्या बँकेचे खातेच रिकामे होत असल्याच्या तक्रारी सायबर सेलकडे दररोज प्राप्त होत आहेत. त्यामुळे अशा फसव्या लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियातून पीएम शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली आपले खाते अपडेट करा, आपला पंतप्रधान सन्मान निधी जमा झाला का चेक करा, तुमचा अडकलेला हप्ता मिळवा, तुमचा हप्ता आत्ताच मिळवा, अशा एक ना अनेक प्रकारच्या मेसेजमधून अशी एक एपीके लिंक 'व्हायरल' होत आहे. या लिंकवर क्लीक करताच शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. ही एकप्रकारे सायबर फसवणूक आहे. तुम्ही या लिंकवर क्लिक केल्यानंतर मोबाइल फोनमध्ये एक अॅप्लिकेशन डाउनलोड होते. त्यानंतर मोबाइल आणि सिम कार्ड हॅक होते. मोबाइल आणि सिम कार्डचा कंट्रोल घेतला जातो. अशा प्रकारे आपली फसवणूक झाली असेल तर तत्काळ बँकेला अथवा सायबर सेलशी संपर्क करून तक्रार दाखल करावी.

आठ महिन्यांत 'सायबर'कडे ७०वर तक्रारी जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्याच्या कालावधी पीएम किसान योजनेच्या नावाखाली शेतकयांची फसवणूक झाल्याच्या तब्बल ७० वर तक्रारी प्राप्त झाल्यात. काहींनी गुन्हा दाखल करण्यास मनाई केली, तर काहींची किरकोळ स्वरूपात रक्कम गेल्याने तक्रार देण्यास टाळले. मात्र, ही फसवणूक सध्या वाढतच चालली आहे.

गोपनीय बँकिंग माहिती देणे टाळा फसवणूक करणारे गोपनीय बैंकिंग माहिती घेऊन फसगत करतात. पण, सरकार असे कॉल करत नाहीं किया कोणतीही बैंक करत नाही. त्यामुळे ई-केवायसीच्या नावे घेणाऱ्या कॉल्सची माहिती शेअर करू नका. 

सालोडच्या शेतकऱ्याला ८६ हजारांनी गंडा सालोड हिरापूर येथील विनोद मारोतराव फटिंग याच्या व्हॉट्सअॅपवर पीएम किसान योजना या नावाची लिंक आली. त्या लिंकवर विनोदने क्लिक करून त्यामध्ये स्वतःचा मोबाइल ट्रामांक टाकला. त्यानंतर त्याच्या मोबाइलचे नेटवर्क गेले. गावातीलच एका दुकानात मोबाइल दाखवला असता मोबाइल कंपनीच्या ऑफिसमध्ये जाण्यास सांगितले, मोबाइल कंपनीने नवे सिमकार्ड दिले. मोबाइल सुरु होताच विनोदच्या खात्यातून एसबीआय खात्यातून चार व्यवहाराचे ५२ हजार ६४ रुपये, तर सेंट्रल बैंक ऑफ इंडिया शाखेतील दोन व्यवहारातून २.४६५ आणि एचडीएफसी बँकेतून ३१ हजार ४०० रुपये असे एकूण ८५ हजार १९२९ रुपये इतरत्र वळते झाल्याचे संदेश दिसले. याप्रकरणी सायबर पोलिसांत २५ रोजी गुन्हा दाखल केला आहे.

ई-केवायसीच्या नावे सुरु आहे 'फ्रॉड'पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्याऱ्यांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला कोणताही कॉल, मेसेज किवा कोणतीही अनोळखी लिंक आली असेल तर चुकूनही त्यावर क्लिक करू नका, अन्यथा फसवणूक करणारे तुमची फसवणूक करू शकतात. 

अशा लोकांपासून नागरिकांनो दूर राहाया योजनेंतर्गत अनेक शेतकरी आहेत ज्यांना मागील हप्त्याचा लाभ मिळू शकलेला नाही. यामागे कारण असू शकतात. मात्र. जर कुणी तुम्हाला हप्ता मागितला आणि त्या बदल्यात तुमच्याकडून पैसे घेतले तर तुम्ही सावध राहा, कारण असे लोक तुमच्याकडून पैसे घेतात.

टॅग्स :wardha-acवर्धाFarmerशेतकरीfarmingशेती