शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

औद्योगिक वसाहतीला जमीन देण्यास शेतकऱ्यांनी दर्शविली संमती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:49 IST

उद्योगांकरिता येथे मिनी एमआयडीसी कार्यरत आहे. या औद्योगिक वसाहतीचा २३४ हेक्टरमध्ये विस्तार होणार आहे.

शासन देणार रेडिरेकनरच्या दीडपट भाव लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा (घा.) : उद्योगांकरिता येथे मिनी एमआयडीसी कार्यरत आहे. या औद्योगिक वसाहतीचा २३४ हेक्टरमध्ये विस्तार होणार आहे. याबाबतचे नोटीफीकेशनही जाहीर करण्यात आले आहे; पण दर काय देणार, या वादात पाच वर्षांपासून शेतकऱ्यांनी जमीन अधिग्रहणास शासनाला संमती दिली नव्हती. परिणामी, औद्योगिक वसाहत विस्तारली नव्हती. आता रेडीरेकनरच्या दीडपट भाव देत जमिनी अधिग्रहित करण्यास शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. यामुळे एमआयडीसी विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. एमआयडीसीच्या विस्ताराबाबत ‘लोकमत’ पाठपुरावा केला. यापूर्वी दोन सभा झाल्या; पण निर्णयक्षम अधिकारी उपस्थित नसल्याने जमीन अधिग्रहनाचा भाव किती द्यायचा, याबाबत निर्णय होऊ शकला नाही. २१ जुलै रोजी १०० शेतकरी व संबंधित अधिकाऱ्यांची तहसील कार्यालयात संयुक्त सभा झाली. या सभेला माजी आमदार दादाराव केचे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संगीतराव, उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा, क्षेत्र व्यवस्थापक भानुदास यादव व तहसीलदार महेश शितोळे उपस्थित होते. चर्चा केल्यानंतर झालेल्या वाटाघाटीत शेतकऱ्यांकडून अधिग्रहीत केलेल्या जमिनीला रेडिरेकनरच्या दीडपट भाव देण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले. तत्सम प्रस्तावही त्वरित शासनाकडे पाठविण्याचे ठरले. काही व्यापारी प्रवृत्तीच्या शेतकऱ्यांनी पाचपट भावाची मागणी केली होती; पण ती अधिकाऱ्यांनी नाकारली. रेडीरेकनरच्या दीडपट भाव जमिनीला देण्याचे शासनाने व घेण्याचे शेतकऱ्यांनी मान्य केल्याने जमीन अधिग्रहण करण्याचा तिढा संपुष्टात आला आहे. यामुळे एमआयडीसीच्या कामाला वेग येणार असून तालुक्याची एक मोठी समस्या निकाली निघेल. तथा विकासाला गती मिळेल, असा समाधानाचा सूर उमटत आहे. औद्योगिक वसाहतीला लागणाऱ्या पाण्याची तरतूद कार प्रकल्पातून केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. कित्येक वर्षांपासूनचा तिढा सुटल्याने आता कारंजा एमआयडीसीचा विस्तार झपाट्याने होऊ शकणार आहे. शेतकऱ्यांना प्राधान्य द्या कारंजा औद्योगिक वसाहतीच्या विकासासाठी तालुक्यातील तब्बल १२० शेतकऱ्यांची २३४ हेक्टर मोलाची जमीन जाणार आहे. यामुळे जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना या एमआयडीसीमध्ये व्यवसाय करण्यास प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणीही शेतकऱ्यांतून समोर येत आहे. शिवाय औद्योगिक वसाहतीत येणाऱ्या उद्योगांमध्ये जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त होत आहे.