शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

जिल्हाधिका-यांच्या दालनासमोर शेतक-यांचा एल्गार, पीक विम्याच्या पद्धतीत सुधारणेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 15:00 IST

गत वर्षी पीकविम्याचे कवच घेणा-या जिल्ह्यातील कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतक-यांची संख्या ३५ हजारांच्या आसपास आहे.

वर्धा : गत वर्षी पीकविम्याचे कवच घेणा-या जिल्ह्यातील कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतक-यांची संख्या ३५ हजारांच्या आसपास आहे. शिवाय मागील वर्षी गुलाबी बोंडअळी आणि निसर्गाच्या हलरीपणाचा चांगलाच आर्थिक फटका शेतक-यांना सहन करावा लागला. परंतु इफ्को टोकियो जनरल इंशुरन्स कंपनीने केवळ ७७९ शेतक-यांना नुकसानभरपाई पोटी नाममात्र आर्थिक मोबदला दिला. पीकविम्याची ही पद्धत शेतक-यांच्या अडचणीत भर टाकणारी असून त्यात सुधारणा करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिका-यांच्या दालनासमोर ठिय्या देण्यात आला. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली होती. आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिका-यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले. सदर निवेदन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी स्वीकारले. या आंदोलनाचे नेतृत्त्व माजी जि.प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, कृषी मूल्य आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे तिगावकर यांनी केले. या आंदोलनात महेश आगे, प्रमोद वरभे, कृष्णा गुजरकर, अनिल डफरे, गजानन सावरकर, महादेव धोपटे, विनोद क्षीरसागर, गजानन निवल, प्रवीण पाल, अभय देवढे, ज्ञानेश्वर काळे, पुरुषोत्तम देवतळे, अनंत कोपरकर, गणेश तुमसरे, किशोर भोयर, अमोल आत्राम, रामेश्वर महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.