वायगाव(ह.) येथील शेतकऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: August 22, 2014 00:02 IST2014-08-22T00:02:26+5:302014-08-22T00:02:26+5:30
मृग नक्षत्र कोरडे गेले थोड्या फार पावसाने कपाशीची लावगड केली. त्यातील अर्धी उगवलीच नाही. यात आर्थिक सोय करून दुसऱ्यांदा लावन केली. ती अतिवृष्टीने वाहून गेली. पुन्हा तिसऱ्यांदा लावन केली;

वायगाव(ह.) येथील शेतकऱ्याची आत्महत्या
तिसऱ्यांदा पेरणी करूनही शेतात पीक नाही
समुद्रपूर : मृग नक्षत्र कोरडे गेले थोड्या फार पावसाने कपाशीची लावगड केली. त्यातील अर्धी उगवलीच नाही. यात आर्थिक सोय करून दुसऱ्यांदा लावन केली. ती अतिवृष्टीने वाहून गेली. पुन्हा तिसऱ्यांदा लावन केली; परंतु पावसाने दडी मारल्याने अंकुरलेली कपाशी करपू लागली. यामुळे हताश झालेल्या वायगाव(ह.) येथील शेतकरी बापूराव काशीनाथ शंभरकर (७०) वर्षे याने शेतात झाडाला गळफास घेऊन आत्मत्या केली.
एक महिना पावसाने दडी मारल्याने कोरड्या दुष्काळाचे सावट तालुक्यावर पसरले आहे. १५ जुलै पासून तालुक्यात पाऊस आला. यावेळी आठ ते १० दिवस चांगला पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करीत पेरणी आटोपून घेतली. वायगाव येथील शेतकरी बापूराव शंभरकर यांच्याकडे पाच एकर शेत आहे. पावसाच्या काळात शेतात कपाशीची लागवड केली. पहिली पेरणी अर्धीच उगविली. त्यांनी दूबार, तिबार पेरणी केली. तीही उगविली नाही. त्यांच्यावर भारतीय स्टेट बँक समुद्रपूरचे ३० हजार रुपयांचे कर्ज, कृषी केंद्राचे उधारीचे पैसे कसे द्यायचे या विवंचनेत ते होते. पावसाने दडी मारल्यामुळे हतबल होत त्यांनी शेतातील झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपवली. दुपारी नातू मयुर व नात अश्विनी महाविद्यालयातून आल्यानंतर शेतात गेली असता सदर प्रकार उघडकीस आला. त्याच्या मागे मुलगा, मुलगी व आप्त परिवार आहे. सदर शेतकऱ्याना शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.(तालुका प्रतिनिधी)