ट्रॅक्टर उलटून युवा शेतकरी ठार

By Admin | Updated: June 3, 2017 00:22 IST2017-06-03T00:22:09+5:302017-06-03T00:22:09+5:30

शेतात जात असलेला ट्रॅक्टर कॅनलवरुन उलटल्याने युवा शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

The farmer killed the tractor and killed young farmers | ट्रॅक्टर उलटून युवा शेतकरी ठार

ट्रॅक्टर उलटून युवा शेतकरी ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा (घाडगे) : शेतात जात असलेला ट्रॅक्टर कॅनलवरुन उलटल्याने युवा शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तालुक्यातील सुसुंद्रा(हेटी) शिवारात गुरुवारी दुपारी हा अपघात झाला. देवेंद्र सहारे (३०) असे मृतकाचे नाव आहे. तर अक्षय आमझिरे रा. बेलगाव व मयुर सहारे (१५) रा. सुसुंद्रा(हेटी), अशी जखमींची नावे आहेत.
तालुक्यातील शेतकरी सध्या जांभूळवाहीच्या कामात व्यस्त आहेत. सुसुंद्रा येथील देवेंद्र सहारे याने शेतातील कामांकरिता बुधवारी गावातील गोपिचंद ढोले यांचा ट्रॅक्टर सांगितला. चालक अक्षय आमझिरे, देवेंद्र सहारे व मयुर सहारे हे तिघेही ट्रॅक्टरने शेतात जात होते. दरम्यान, ट्रॅक्टर कॅनलवरुन उलटला. यात देवेंद्र सहारे हा ट्रॅक्टरखाली दबल्याने जागीच ठार झाला.

Web Title: The farmer killed the tractor and killed young farmers