बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 06:00 IST2020-01-06T06:00:00+5:302020-01-06T06:00:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : सरपणाकरिता जंगलात गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला चढविला. यात ते जागीच ठार झाले. ही ...

Farmer killed in Leopard attack | बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार

ठळक मुद्देपाच लाखांची तात्काळ मदत : वनविभागाने लावली गस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : सरपणाकरिता जंगलात गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला चढविला. यात ते जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी दुपारी ३ वाजतादरम्यान मलकापूर शिवारातील किन्ही मार्गावर घडली. या घटनेने गावात दहशत निर्माण झाली असून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी गस्त लावली आहे.
बकाराम धुर्वे (६५) रा. गौरखेडा वॉर्ड, असे मृत शेतकºयाचे नाव आहे. ते शनिवारला मलकापूर शिवारातील रस्त्याने किन्ही येथे जात होते. यादरम्यान वाटेत सरपण गोळा करीत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यामुळे बकाराम यांचा जागीच मृत्यू झाला. रात्रीच बराच वेळ झाल्यावरही बकाराम घरी न परतल्याने त्यांचा मुलगा नंदु याने मित्राच्या मदतीने शोध घेतला. मात्र त्यांचा कुठेही शोध लागला नाही. त्यामुळे त्याने आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवित वनविभागाली माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी २० वनरक्षक, ४ वनपाल यांना सोबत घेऊन जंगल गाठले. ठाणेदार जितेंद्र चांदे यांनीही पोलिसांना घेऊन वनविभागाच्या चमुसह शोध सुरू केला. मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास बकाराम यांचा मृतदेह सापडला. घटनास्थळाचा पंचनामा करुन आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. रविवारी दुपारी १२ वाजता शेतकºयाचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपविण्यात आला. वनविभागाकडून मृताच्या कुटुंबाला तत्काळ पाच लाख रुपयाच्या मदतीचा धनादेश देण्यात आला. त्यांच्या अंत्यसंस्काराला सरपंच युसुफ शेख, जनशक्ती संघटनेचे आनंद निंबेकर, नाशीर शेख, रशीद खान, संजय जाणे, किसन कौरती, शफी अहमद, विजय गंजीवाले यांच्यासह गावकरी उपस्थित होते. वनविभागाने रविवारी सकाळपासून २० वनरक्षक, १५ मजूर, ४ वनपाल यांच्यासह मलकापूर, आष्टी, किन्ही, पंचाळा मौजात गस्त सुरू केली आहे. शेतकरी, शेतमजुरांनी सायंकाळी ५ वाजतानंतर जंगलाकडे जाऊ नये असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी केले आहे. यासाठी दवंडी देण्यात आली आहे. वर्धा येथून उपवनसंरक्षक सुनील शर्मा यांच्यासह चमुनेही परिस्थितीचा आढावा घेतला आहे. शेतकरी बिबट्याच्या दहशतीमुळे चांगलेच भयभीत झाले आहे.

Web Title: Farmer killed in Leopard attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.