शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

लंडनच्या महिलेशी फेसबुकवरील ‘मैत्री’ ठरली धोक्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 2:34 PM

दररोज कुणा ना कुणाला सायबर भामटे आपल्या जाळ्यात अडकवित आहेत. अशीच घटना वर्धा शहरात घडली. एका महिलेने लंडनला राहात असल्याचे सांगत भेटवस्तूसाठी एक्साईज ड्यूटी हवी म्हणून व्यक्तीला ५० हजारांनी गंडा घातला.

ठळक मुद्दे५० हजारांनी घातला गंडाव्हॉट्सअ‍ॅपवर करायचे ‘चाटिंग’

चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सोशल मीडियावरून फसवणुकीच्या घटना दररोज घडत आहेत. दररोज कुणा ना कुणाला सायबर भामटे आपल्या जाळ्यात अडकवित आहेत. अशीच घटना वर्धा शहरात घडली. एका महिलेने लंडनला राहात असल्याचे सांगत भेटवस्तूसाठी एक्साईज ड्यूटी हवी म्हणून व्यक्तीला ५० हजारांनी गंडा घातला.फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचा सल्ला पोलीस विभागाकडून देण्यात येतो. पण, काही जण आमिषाला बळी पडून स्वत:च या जाळ्यात ओढले जातात. वर्धा शहरातील गोंड प्लॉट परिसरातील रहिवासी माधव नारायण अहिर (४२) यांची फेसबुकवर एका अज्ञात महिलेशी मैत्री झाली. त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. मैत्री इतकी पुढे गेली की, माधव आणि त्या महिलेमध्ये मोबाईल क्रमांकांची देवाण-घेवाण झाली. त्यानंतर दोघेही व्हॉट्सअ‍ॅपवर एकमेकांशी चाटिंग करू लागले. महिलेने मूळची दिल्ली येथील रहिवासी असल्याचे सांगून सध्या लंडनमध्ये वास्तव्यास असल्याचे सांगितले.दोघांमध्येही मैत्री वाढू लागली. दरम्यान, काही दिवसांनी महिलेने लंडन येथून भेटवस्तू आणत असल्याचे माधव यांना सांगितले. आपल्यासाठी कोणीतरी भेटवस्तू आणणार, हे ऐकून माधवही आनंदी होता. महिलेने भारतात परत येण्याची तारीख ठरविली. त्यानुसार माधव यांना महिलेने १८ फेब्रुवारी रोजी आपण दिल्ली येथे येत असल्याचे सांगितले. १८ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास माधवला महिलेचा फोन आला आणि आपण दिल्लीच्या एअरपोर्टवर आल्याचे सांगितले. तसेच तुमच्यासाठी भेटवस्तू आणली असून माझे कार्ड ब्लॉक झाल्याने एक्साईज ड्यूटी भरण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितले. साहित्य सोडविण्यासाठी महिलेने माधवकडे पैशाची मागणी केली. लंडनची मैत्रिण भारतात आल्याच्या आनंदाने भारावून गेलेल्या माधवने लगेच पैशाची जुळवाजुळव केली.माधव यांनी १८ रोजी सकाळी ११ वाजता आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधून लंडनच्या महिलेच्या अकाऊंटवर ४६ हजार ९०० आणि ३ हजार १०० असे एकूण ५० हजार रुपये वळते केले. काहीवेळ उलटल्यावर महिलेने पुन्हा १२ वाजून २४ मिनिटांनी माधव यांना फोन केला आणि परत ७५ हजार रुपयांची मागणी केली. पुन्हा पैशाची मागणी केल्यावर मैत्रिणीची मदत करणाºया माधव यांच्यात संशयाची पाल चुकचुकली. फसगत होत असल्याचे त्यांना लक्षात आले. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी पोलिसांत तक्रार दाखल केली.बँक खाते निघाले मुंबईचेलंडन येथील महिलेने वारंवार पैशाची मागणी केल्यावर माधव यांना फसगत झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पैसे पाठविलेल्या बँक अकाऊंटची माहिती काढली असता ते अकाऊंट मोहम्मद जाबीर अब्दुल जब्बार सय्यद रा. ५०३ ई विंग मोनालिया एन्क्लेव्ह, महार अमरीत चांदेवली जैन मंदिर, अंधेरी मुंबई यांचे असल्याचे लक्षात आल्यानंतर माधव अहिर यांनी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

मैत्रिणीचा मोबाईल बंद असल्याने माधवची तारांबळमाधव अहिर यांनी महिलेच्या अकाऊंटवर पैसे पाठविल्यानंतर लगेच तिच्या मोबाईल क्रमांकावर फोन केला पण, महिलेचा मोबाईल क्रमांक सतत बंद असल्याचे समजताच माधव यांची तारांबळ उडाली. मैत्रिण येत असल्याच्या आनंदावर विरजण पडले.

टॅग्स :Facebookफेसबुक